राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस येथील एका शाळेतील शिक्षकानेच मुख्यध्यापकाच्या कानसुळात लगावली.

राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस येथील एका शाळेतील शिक्षकानेच मुख्यध्यापकाच्या कानसुळात लगावली.

राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस येथील एका नामांकीत मराठी शाळेतील एका शिक्षकानेच मुख्यध्यापकाच्या कानसुळात लगावली या घटणे मुळे तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे

असे कृत्य जर शाळेतील मुलांसमोर होत असेल तर शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी शिक्षणाचा काय बोध घ्यावा असा सवाल डिग्रस येथील जनतेमध्ये होत आहे याआधी मुलांना शिकवणे वरून व तलबी वरून मुख्याध्यापकाने या शिक्षकाला झापण्याचे प्रकार घडून ही त्यावर याचा काहीच परिनाम होत नव्हता याचा राग मनात धरून या शिक्षकाने चक्क मुख्याध्यापकाच्याच कानसुळात लगावली याविषयी डिग्रस येथील एका प्रतिष्ठीत नागरीकाने च या शिक्षकावर काय कार्यवाही केली असा लेखी तक्रार अर्ज शिक्षण अधिकाऱ्या कडे केला आहे

तरी अशा शिक्षकांवर मुख्याध्यापकाचा वचक कसा बसेल या घटनेमुळे शिक्षक व मुख्याध्यापक दोघेही रजेवर गेले आहे 

विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सध्या सुरू होण्याच्या अंतिम टप्यात आहे 

या घटणेमुळे पालक वर्गात मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त होतांना दिसत आहे शिक्षण अधिकारी काय ?कार्यवाही करणार असा तालुक्या सह जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.