नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले
आज देडगाव शाखेत ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पड ला. प्रथमता श्री संत नागेबाबा या प्रतिमेचे पूजन करून कार्य क्रमाला सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्पोरेट शाखेचे अधिकारी कमलेश थिटे सर यांनी केले प्रास्ताविकात नागेबाबा शाखा ही 365 दिवस अविरत चालणारी शाखा आहे. खातेदारांची सेवा करण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी विचारधन दिनदर्शिकेच्या माध्यमातून नवीन विचारांची देवाण-घेवाण केली आहे .ही माहितीन देउन शाखेचे महत्त्व पटवून देण्यात आले .
यावेळी शाखेच्या वतीने ह .भ. प .सुखदेव महाराज मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला . या सोहळ्यास देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे पाटील .माजी चेअरमन कडूभाऊ तांबे ,माजी चेअरमन लक्ष्मण बनसोडे, पत्रकार बन्सी एडके ,बालाजी देवस्थान रामानंद मुंगसे ,माजी सरपंच दत्तापाटील मुंगसे, श्रीकांत हिवाळे ,हवालदार पठाण ,इस्माईल पठाण ,जालिंदर खांडे ,भानुदास गटकळ, सचिव रामा तांबे ,संपत ससाने ,उत्तम तांबे , देडगाव शाखेचे शाखा अधिकारी पांडुरंग एडके ,सौ सुलभा नागरे मॅडम ,हर्षदा क्षिरसागर मॅडम ,प्रसाद सर व आ दी खातेदार सभासद उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले तर आभार शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी मानले..