नेवासा खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कोलते यांच्या निवडीबद्दल देडगाव ग्रामस्थ च्या वतीने भव्य नागरी सत्कार.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नेवासा खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कोलते यांची तिसऱ्यांदा नूतन निवड झाल्याबद्दल बालाजी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा शिक्षण भूषण पुरस्करते, माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे यांनी म्हटले की, गेली अनेक वर्षापासून गडाख घुले यांच्या नेतृत्वाखाली खरेदी विक्री संघाचे चांगले काम केले गेले आहे. हीच परंपरा राखत याही वर्षी बिनविरोध निवड करून हुनहार माणसाला संधी दिली आहे. तर नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.तर चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचे संस्थापक सागर बनसोडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी खरेदी विक्री संघाचे नूतन अध्यक्ष प्रभाकर कोलते शहापूर , संचालक रमेशराव गोर्डे ,भेंडा बुद्रुक ,संचालक सोपानराव चौधरी रांजणगाव , शहापूर सोसायटीचे उपाध्यक्ष विजय मांडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रभाकर कोलते बोलताना म्हणाली की नामदार शंकरराव गडाख यांनी जी काही माझ्यावर जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत या पुढील काळात संधीचे सोने करून दाखवील व सर्वांना बरोबर घेऊन काम करील व खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून विकास करण्याचं माझं नेहमी ध्येय राहील अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम,विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे ,पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, बन्सी पाटील मुंगसे ,पांडुरंग महाराज रक्ताटे,माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे ,माजी सरपंच रामेश्वर गोयकर, दत्ता पाटील मुंगसे ,विद्यमान चेअरमन महेश कदम ,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे ,विश्वस्त रामभाऊ कुटे,ग्रामपंचायत सदस्य जालिंदर खांडे, गणपत तात्या कोकरे ,जनार्दन तांबे, कडूभाऊ दळवी, नारायण मुंगसे व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस
पठाण यांनी केले तर आभार संतोष तांबे यांनी मानले.