बालाजी देडगाव येथे हजरत सय्यद शहा वली यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा.

बालाजी देडगाव येथे हजरत सय्यद शहा वली यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दर वर्षीप्रमाणे हजरत सय्यद शहा वली यांचा उरूस याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

           दर वर्षी प्रमाणे उरुसाच्या आदल्या दिवशी गंगेचं पाणी आणून गाव मध्ये कावडीचे जंगी स्वागत केलं जातं. कावडीच्या पाण्याने हजरत शहा सय्यद वली यांच्या दर्याला पाणी टाकून पवित्र केले जाते. नंतर संध्याकाळी संदल मिरवणूक काढण्यात येते .यावेळी पुष्पांची मोठी चादर मिरवली जाते. यामध्ये सर्व जाती धर्मीय मोठ्या भक्ति भावाने सहभागी होत असतात.

        दुसऱ्या दिवशी सकाळी दर्ग्यामध्ये मोठा जल्लोष साजरा केला जातो. फुलांची चादर घालून व देवापुढे रुढी परंपरा प्रमाणे व्हईक सांगितले जाते. व यामध्ये अडीअडचणीची कोडीही सोडवली जातात. हा उरूस जिल्ह्यातील नामवंत उरूस समजला जातो. 

     या उरुसाला माळी समाज चा मोठा मान असतो हा समाज मोठया प्रमाणावर या दर्ग्याला पुजतात. या दर्ग्याला मुस्लीम समाजातील लोक हि मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दर्ग्याचे पुजारी लियाकत करीमभाई पठाण हे काम पाहतात. 

        या कार्यक्रमा नंतर गोड भात व मलिदा याचा मोठा नेवेद्य केला जातो. या दर्ग्याला याचा मान आहे. सर्व भाविक मोठ्या आनंदाने प्रसादाचा लाभ घेतात.

     या कार्यक्रमास उपस्थित सर्व देडगाव ग्रामस्थ व बाहेरील भाविक मोठ्या संख्येने हजर राह

तात.