सांगलीतील सौ. ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणी – अहिल्यानगरमध्ये धर्मांतरविरोधात जनआक्रोश मोर्चा

सांगलीतील सौ. ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणी – अहिल्यानगरमध्ये धर्मांतरविरोधात जनआक्रोश मोर्चा

सांगलीतील सौ. ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणी – अहिल्यानगरमध्ये धर्मांतरविरोधात जनआक्रोश मोर्चा

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

अहिल्यानगर | २२ जून २०२५
सांगली शहरातील उच्चशिक्षित व गर्भवती विवाहित महिला सौ. ऋतुजा सुकुमार राजगे यांनी सासरकडून 'ख्रिश्चन' धर्मांतरणाचा दबाव आणि मानसिक छळ सहन न झाल्यामुळे आत्महत्या केली, ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत अहिल्यानगर येथे हिदुत्वावादी संघटनेने आज रविवार, दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत भव्य धर्मांतरविरोधी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्केटयार्ड या मार्गाने येऊन सभेत रूपांतर झाले, यावेळी हजारो उपस्थित नागरिकांनी एकत्र येत, सौ. ऋतुजा यांना श्रद्धांजली अर्पण केली व धर्मांतराच्या विरोधात घोषणा देऊन रोष व्यक्त केला.

✊ प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन:

श्री. अशोक बाबा पालवे. शिव गोरख योगी अस्थाना नगर चे मठाधिपती

अँड. सौ. वर्षाताई डहाळे – सामाजिक कार्यकर्त्या

मा. आ. गोपीचंदजी पडळकर – हिंदू धर्मरक्षक

मा. आ. संग्रामभैय्या जगताप – हिंदू धर्मरक्षक


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शक वक्त्यांनी धर्मांतराच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आणि सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली.