सुलोचनाताई पटारे-पूरनाळे या सामाजिक भान जपणाऱ्या प्रशासनाधिकारी-सौ सुनिताताई गडाख
प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद नेवासा
नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुलोचनाताई पटारे-पूरनाळे यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने माजी सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी सभापती रावसाहेब कांगुणे , माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे , निवासी नायब तहसीलदार सानप , तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सूर्यवंशी, साहित्यिक संजय कळमकर, नगरसेवक सोनवणे, सचिन नागपुरे, माजी गटविकास अधिकारी श्याम पुरनाळे, प्राचार्य सोपानराव काळे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सुनिताताई गडाख यांनी शिक्षण विभागाच्या गुणवत्तापूर्ण कामाचे श्रेय सौ. पटारे यांना दिले. कोरोना कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देत प्रभावी काम त्यांनी शिक्षकांकडून करून घेतले. प्राथमिक शिक्षक तळागाळापर्यंत जाऊन तळमळीने काम करतात. चांगल्या कामामुळे त्यांच्यावर अनेक अशैक्षणिक कामांचाही सदैव बोजा असतो परंतु या कामांचे दडपण येऊ न देता सर्वांकडून सौ पटारे यांनी हसत खेळत काम करून घेतले. कोरोना काळात सामाजिक भान जपत पटारे मॅडम यांच्या कल्पकतेतून शिक्षण विभागाने विविध मार्गाने वस्तूरूपाने अंदाजे वीस लाख रुपयाची मदत केली. कोरोना काळात आईवडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. अशा विविध प्रकारे आपल्या प्रशासकीय कामकाजाबरोबरच समाजाप्रती सदैव जागरूक राहून काम करणाऱ्या सौ पटारे मॅडम यांना सेवापूर्तीच्या निमित्ताने शुभेच्छा मुळा उदयोग समूहाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. शिक्षण विभाग बी आर सी टीम, केंद्रप्रमुख, ज्ञानज्योति समूह, अस्मिता ग्रुप, क्रांतिज्योती समूह, सर्व शिक्षक संघटना या सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कामे केली अशा वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर, राहुरी ,नगर नेवासा या सर्व तालुक्यातील स्नेहीजन यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी रावसाहेब पाटील कांगुणे, संजय कळमकर, अभिराज सूर्यवंशी, नायब तहसीलदार सानप, बाळासाहेब सोनवणे यांनी मनोगते झाली. प्रास्तविक साधन व्यक्ती शमी शेख, सूत्रसंचालन आदर्श शिक्षक डॉ रेवणनाथ पवार, आभार डॉ स्वपिल पुरनाळे यांनी केले,