गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी सलबतपुर ची चाइल्ड करिअर इंग्लिश शाळा.

गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी सलबतपुर ची चाइल्ड करिअर इंग्लिश शाळा.

*गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी सलाबतपुरची चाईल्ड करीअर शाळा*

        दूध हे पूर्णाहार असतानाही त्यात अधिकची जीवनसत्वे प्रथिने टाकुन पिण्याचा हा काळ असताना या काळात काही निवडक शाळा मुलांना कला क्रीडा,शारीरिक शिक्षण, बौद्धिक स्पर्धा या सारख्या उपक्रमांच्या विषयांचे अधिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करताना दिसून येतात अशा निवडक शाळांमध्ये अनलॉक एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाची खरी दारे उघडण्याचे काम करण्यात सलाबतपूर ची चाइल्ड करियर स्कूल ही इंग्रजी माध्यमांची शाळा अग्रस्थानी आहे.

        शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता हा एक मुख्य विषय बनला आहे.जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्तेची मागणी वाढत चाललीय.व ती मागणी ती मागणी पूर्ण करण्यासाठी सलाबतपुर ची "चाईल्ड करीअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज"ही शाळा पूर्ण करतांना दिसते आहे.या शाळेने शहरातील सर्व संधी गावात उपलब्ध करून गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह आपली गुणवत्ता अल्पावधीत सिद्ध केली.

         हेड , अँड हार्ट डेवलपमेंट हे ब्रीद वाक्य शाळेबाबत सर्व काही सांगून जाते. लेखन वाचन गणन या सर्व क्रिया मुलांना याव्यात म्हणून सर्व शाळा धडपडत असताना विद्यार्थ्यांमध्ये हॅन्ड म्हणजे श्रमप्रतिष्ठा किंवा कोणतेही काम सुत्र नाही हार्ट म्हणजे मन किंवा आपल्यात माणूसपणा जगवण्यासाठी झटताना आपल्या नजरेत सहज भरते.

        इंग्रजी माध्यमाची शाळा म्हंटले की अवाढव्य फी च झालेले समीकरण पालकांच्याच नव्हे तर शिक्षण तज्ञांच्याही पोटात भीतीचा गोळा उभा करतो. पण या शाळेने शेतमजुराला भाजी विक्रेत्याला परवडेल इतकी कमी फी घेऊन ना नफा ना तोटा या तत्त्वावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य आरंभल्याचे लक्षात येते. तसेच शासनाच्या निर्देशानुसार आर्थिक दुर्बल वंचित घटकातील मुलांना 25% मोफत प्रवेश पूर्ण क्षमतेने दिलेले दिसतात. याशिवाय तिच्या कारणाने शाळा सोडून जाण्याचे प्रयत्न या शाळेत शून्य टक्केच.

        काही श्रीमंत पालकांना गरिबांची मुले दत्तक घ्यायला लावून गरिबांच्या घरी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचा शाळेचा प्रयत्न स्तुत्य

 मानावा लागेल.

        शाळा अर्थार्जनासाठी नाहीतर ज्ञान प्रसारासाठी निर्मावी ही युक्ती या शाळेसाठी ठरते. जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असणारे परदेशी फळझाड आपल्या मातीत रुजवायला, वाढवायला जसा अधिकचा किंवा जास्तीचा काळ घेत तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण मातीत रुजवताना अधिकचा संघर्ष या शाळेने अनुभवला असला तरी केवळ गुणवत्तेच्या अभ्यासामुळे अधिकचा विद्यार्थी वर्ग येथे शिक्षण घेताना पाहिला की शाळेचे कौतुक करावेसे वाटते.

         संस्कृतीचा परिसस्पर्श देता यावा म्हणून शाळेने स्वतःला उपक्रमाचे मोहोळ बनवले आहे शाळेत त्यासाठी गणेश उत्सव, रक्षाबंधन, दिवाळी यासारखे भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात शेतीप्रधान देशाचा नागरिक असावा म्हणून वनराई उभारणे शेत शिवार फेरीचे आयोजन केले जाते. शेतीतील तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनास भेटी यासारख्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शाळा करते. नागरिक पर्यावरणाचा रक्षक बनवा म्हणून वृक्ष संवर्धन इको फ्रेंडली गणेश उत्सव मेकिंग कार्यशाळेतून विघटन न होणाऱ्या गणेशमूर्तींची निर्मिती व वितरण शाळा करते.

 विद्यार्थी सशक्त भारताचा नागरिक बनावा म्हणून योगा प्राणायाम यासारखी आरोग्यरक्षक प्रणाली शाळेत शिबिरे भरवून विद्यार्थ्यांना तयार करते. याचाच परिपाक म्हणून लहान वयातच या शाळेतील अनेक विद्यार्थी खेळाडू राज्य स्तरावर चमकत आहेत. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावा म्हणून नॅशनल ओलंपियाड या सारख्या बौद्धिक स्पर्धा परीक्षांचे आयोजन करुन अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.

     सायन्स फाउंडेशन नवी दिल्ली यासारख्या विज्ञानाधारित स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी सुवर्णपदक विजेते नसतील तर नवलच.

        जगण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळा पातळीवर नृत्य नाट्य गायन वादन अभिनय चित्रकला व शिल्पकला या सप्त ललित कलांचा अनुभव शाळा म्हणून तर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या शाळेच्या कल्चर शोला प्रथम उपस्थिती दर्शवली आहे.तसेच शासकीय चित्रकला परीक्षेत जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांनी मजल मारलेली दिसते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुबक,सुंदर व वळणदार व्हावे म्हणून ख्यातनाम अक्षरतज्ञांच्या अक्षर कार्यशाळांचे आयोजन शाळा करते.ज्युनिअर कॉलेज ची सायन्स शाखा संस्थेने सुरू केली असून अकरावी ,बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने"ऊर्जा वकृत्वाची, वृध्दी ज्ञानाची"हा उपक्रम सुरू करून प्राध्यापक,शिक्षक,व शिक्षणतज्ज्ञ यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.वेगवेगळ्या स्पर्धेत विद्यार्थी शाळेचे नाव पुढे नेताना दिसतात. व त्यामुळेच पालकांनाही शाळा अनलॉक एज्युकेशन वाटते.

     शेतमजूर शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाल्यास शहरातील दर्जेदार शिक्षण या शाळेने उपलब्ध करून दिले आहे. वर्षातील 365 दिवस मुलांना अध्यापन करण्याची शाळेची तयारी असते. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी संडे क्लासची मोफत योजना शाळेत सुरू आहे. शाळेचे नानाविध शैक्षणिक उपक्रम लक्षवेधी असतात. आणि म्हणूनच ही शाळा गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत नावारूपाला आलेली

दिसते