*"शालेय व्यवस्थापन समितीची" कलंबर (बु). येथे बिनविरोध निवड.*
बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज नांदेड.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
कलंबर (बु.) ता.लोहा -दि.29-03-2022 रोजी
जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर (बु.) येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. समस्त गावकऱ्यांच्या सर्वानुमते ही बिनविरोध निवड करण्यात आली. शालेय समिती अध्यक्षपदी श्री नागोबा(बापूरावआप्पा) मुक्कनवार यांची पहिल्या कारकीर्दीच्या कामाची दखल घेऊन पुनश्च दुसऱ्यांदा मुक्कनवार यांचीअध्यक्षपदी निवड करण्यात आली. खालील प्रमाणे शालेय समितीचे बिनविरोध पदाधिकारी-
:-1) अध्यक्ष-श्री नागोबा संभाप्पा मुक्कानवार 2) उपाध्यक्ष- सौ. मीनाक्षी सुनील कांबळे 3) सदस्य- श्री धनंजय हरी रौत्रे 4) सदस्य- श्री शंंकर शिवाजी सोरगे 5) सदस्य- श्री धर्मराज भगवान रौत्रे 6) सदस्य- सौ. कांचन शिवपालसिंग ठाकूर 7) सदस्य- सौ. रेखाबाई गिरजाजी भोकरे 8) सदस्य- सौ. निर्मला कमलाकर भोकरे 9) सदस्य- सौ. लक्ष्मी सिद्धार्थ्थ सोनसळे 10) सदस्य- सौ. लक्ष्मीबाई माधव गोमस्कर.
बापूरावआप्पा यांनी शाळेच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे यासाठी त्यांच्या मनामधील शाळेतील इमारत, क्रीडा ग्राउंड या करता त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्याकडे शाळेकरिता नवीन इमारत मंजूर झालेली आहे.
आदरणीय आमदार श्री श्यामसुंदर शिंदे यांनी ह्या शैक्षणिक कामात विशेष लक्ष द्यावे असे अध्यक्ष व समस्त शालेय समिती व प्रतिष्ठित गावकरी मंडळीच्या मते अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच गावातील विद्यार्थ्यांना सुंदर असे क्रीडा ग्राउंड तयार व्हावे अशी मागणी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अनिल सोरगे व श्री धनंजय यादव यांच्या गटामार्फत वारंवार मागणी केली गेली आहे.
तसेच यांच्या मागणीला आमदार शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी आपण दिलेल्या मागणीचे पूर्ण काम करू असे आश्वासन दिली आहे.