मराठा एकीकरण समितीने शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे केले आयोजन, कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय राजकारणी आणले एका मंचावर .

मराठा एकीकरण समितीने शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे केले आयोजन, कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय राजकारणी आणले एका मंचावर .

शिवजयंतीच्या निमित्ताने मराठा एकीकरण समितीने सर्वपक्षीय राजकारणी आणले एका मंचावर

 

 

(राहुरी प्रतिनिधी) - बुधवार दि.१९ फेब्रुवारी २५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा बहुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती, जिजाऊंच्या लेकी समूह आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

             सकाळी १०.३० वा.पांडुरंग लॉन्स येथे तहसीलदार नामदेव पाटील, पो. नि.संजय ठेंगे,मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या आरोग्य शिबिरात विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल विळद,ग्रामीण रुग्णालयात राहुरी, लाईफ इन हॉस्पिटल,रोटरी ब्लड बँक राहुरी,टायकाँण चॅरेटेबल फौंडेशन यांनी सहभाग घेतला.यावेळी ज्येष्ठ नेते तान्हाजी धसाळ,धर्मवीर प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे,पै.नितीन कल्हापुरे, डॉ.विक्रम खुरुद,मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे,शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जनार्दन म्हसे, कार्याध्यक्ष अशोक कदम उपस्थित होते.आरोग्य शिबिरास मा.आ.सुधीर तांबे यांनी भेट दिली.शिवजयंती निमित्त ५१ सदस्यांनी रक्तदान केले.

              सायं.६ वा. सुप्रसिद्ध अभिनेता रमेश परळीकर यांचा खेळ पैठणी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ.हरि मोरे (कृषी शास्त्रज्ञ) ,मा.नगराध्यक्ष उषाताई तनपुरे, रनरागिणी महिला मंच अध्यक्ष धनश्री ताई विखे पाटील,देवळाली प्रवराचे मा.नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, पो. नि. संजय ठेंगे, राहुरी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, देवळाली विकास नवाळे, साई आदर्श मल्टीस्टेजचे अध्यक्ष शिवाजी कपाळे उपस्थित होते .हजारो महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

           यावेळी विविध क्षेत्रात निःस्वार्थपने योगदान दिल्याबद्दल दिव्यांग सेवा पुरस्कार शेख सलीम,वैद्यकीय- गौरव तनपुरे,जिजाऊंची लेक- पो.काँ.मंजुश्री गुंजाळ,कृषी तंत्रज्ञान – एसपी अँग्रो,उद्योजक विजय गाडे (शुभम कलेक्शन),आयुर्वेदिक उपचार नारायण सांगळे (८४ वर्ष),हर्शल शेटे(पांडुरंग लाँन्स),ओंकार शेटे(विठ्ठला लाँन्स),अनंत ढूस,भारती वाघ,रक्षक – पो.नि.संजय ठेंगे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

 

            सौ.पूजा रवींद्र मेहेत्रे या खेळ पैठणी कार्यक्रमात पहिल्या आल्या त्यांना जिजाउंच्या लेकी समूहाच्या अध्यक्ष सौ.वर्षा लांबे,कविता म्हसे यांच्या हस्ते पैठणी साडी भेट देण्यात आली. खेळ पैठणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या अरगडे,पुनम शेंडे,राणी तनपुरे,राणी घाडगे,अपर्णा धमाळ,जोती नालकर,वैशाली शेळके,भारती तनपुरे,पोर्णिमा फुलसौंदर,कल्याणी गुलदगड, रोहिणी कोल्हे,ज्योती वर्पे,सुरेखा माकोने सहभाग घेतला.

 

            शिवजयंती उत्सव समितीचे सतीष घुले,संदीप गाडे, मेजर नामदेव वांढेकर,योगेश तनपुरे,संतोष भुजाडी,मधुकर घाडगे,महेंद्र शेळके,डॉ.किशोर पवार,देवेंद्र जाधव,कुलदीप नवले,राजा भोरे,अरुण निमसे,किरण पाटील,बलराज पाटील,अनिरुद्ध मोरे,प्रताप भांड,अविनाश क्षीरसागर,ईश्वर गाढे,सुभाष पवार,सतीश चोथे,विजय कोहकडे,रामदास कटारे,रोहित नालकर,अशोक तनपुरे,शेखर सुडके,भारत टेमक,जालिंदर कोहकडे,विक्रम मोढे,कांता तनपुरे,अँड.अमोल डौले,शरद तनपुरे सह मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी शिवजयंती उत्सव पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.

 

             शिवजयंती कार्यक्रमात खेळ पैठणी कार्यक्रम घेण्याचा मूळ उद्देश महिला भगिनींना एकत्रित आणून अल्पवयीन मुल मुली आई वडिलांच्या संमत्ती शिवाय विवाह करत आहेत.त्याचा समाजाच्या प्रत्येक घटकावर दुष्परिणाम होत आहे.मोबाईल हे एक विष बनले आहे.याचे प्रबोधन करण्यासाठी हजारो महिलांना एकत्रित अनन्या साठी खेळ पैठणी कार्यक्रम आयोजित केला. – देवेंद्र लांबे पाटील – संस्थापक/अध्यक्ष मराठा बहुउद्देषीय संस्था

 

 

 

              राहुरी तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.याच प्रसंगी राहुरी पोलिस ठाण्याचे पो.नि.संजय ठेंगे यांनी श्रीगोंदा बेलवंडी पोलिस ठाण्यात कार्यरत असतांना मानव तस्करीचे रँकेटचा शोध लावला व राहुरी तालुक्यातून मागील तीन वर्षात ५७ मुली बेपत्ता होत्या त्यांचा शोध घेवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या व पो.नि.ठेंगे यांनी राहुरी तालुक्यात कायदा,सुव्यवस्था राखण्यात यश मिळविल्या बद्दल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

             मराठा एकीकरण आयोजित शिवजयंती उत्सवात मा.आ.सुधीर तांबे,मा.नगराध्यक्ष उषाताई तनपुरे,मा.खा.सुजय विखे यांच्या पत्नी सौ.धनश्रीताई विखे,दे.प्र.मा.नगराध्यक्ष सत्यजित कदम,तान्हाजी धसाळ,राजूभाऊ शेटे यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून मराठा एकीकरण च्या मंचावर एकत्रित आले .

             आरोग्य तपासणी शिबिरात तहसीलदार नामदेव पाटील,ना.तहसीलदार संध्या दळवी,पो.नि.संजय ठेंगे,मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.