वै.रामकिसन घोडेचोर (भाऊ)यांच्या प्रथम पुण्यस्मरण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटून केले साजरे.

*वै. रामकिसन घोडेचोर यांचे प्रथम पुण्यस्मरण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटून केले साजरे*
नेवासा तालुका ( प्रतिनिधी युनूस पठाण):- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव गावच अध्यात्मिक क्षेत्रातील वैभव वै. ह. भ. प. रामकिसन त्रिंबक घोडेचोर (भाऊ) वय ९१ जुन्या पिढीतील संगीत भजनी , गायक व माऊली दिंडीचे नियमित वारकरी विठ्ठल भक्त यांचे एका वर्षापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते.
वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर ते उत्तम शेती करत असल्याने प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते .त्यांनी आपल्या जीवनात शेती, प्रपंच आणि परमार्थ ,आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात ह. भ. प. सुडके महाराज यांच्या समवेत 3 वारी केल्या . व ह.भ.प.केशव महाराज गुजर यांच्या समवेत 27 पायी दिंडी वारी करण्याचा योग आला.तसेच ह.भ.प.रामभाऊ महाराज रिंधे यांच्या समवेत 15 पायी दिंडी वारी केल्या. तर प्रत्येक महिन्याच्या एकादशी वारीला श्री.क्षेत्र पैठण या ठिकाणी जात असत .भाऊ यांनी
आपल्या जीवन प्रवासात वै. ह.भ.प.बाबु नाना कुलकर्णी यांना गुरू मानले होते. नानांचा त्यांच्यावरती खूप विशेष प्रभाव होता. त्यांनी क्लासिक भजनात सुकाळे गुरुजी ,चे क्लासेस केले होते. वै. ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांच्या कीर्तनात चालीचा प्रथम मान भाऊंना नेहमी असायचा. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात तेलकुडगाव मधून स्वतःचा एक भाऊ स्व. सिताराम त्रिंबक घोडेचोर साहेब यांना शिकवून पहिला ग्रॅज्युएट केला. दुसरे मोठे भाऊ नामांकित पहिलवान स्व. पै. बाबुराव (दादा) त्रिंबक घोडेचोर हे होते . तेलकुडगाव मधून त्यांच्यासोबत भजनाच्या सहवासात,
वै. ह.भ.प.जगन्नाथभाऊ काळे,
वै. ह.भ.प. दामोदरअण्णा काळे,वै. ह.भ.प.भाऊराव काळे,
वै. ह.भ.प. सीतारामबाबा काळे, वै. ह.भ.प.संतराम महाराज घोडेचोर, वै. ह.भ.प.जनार्दन काळे, वै. ह.भ.प. लक्ष्मण परभणे, ह.भ.प.भैय्यासाहेब कुलकर्णी , ह.भ.प.काळे गुरुजी, ह.भ.प बळवंत गुरुजी काळे, ह. भ. प. ज्ञानदेव आप्पा काळे,
अशा जुन्या भजनी मंडळींचा सहवास लाभला होता. ही भजनी मंडळी प्रख्यात होती.भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त भाऊंच्या कुटुंबीयांकडून ज्योतिषविशारद ह. भ. प. भैय्यासाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विष्णुपंत घोडेचोर, हरिश्चंद्र घोडेचोर, बाबासाहेब घोडेचोर, प्रसाद घोडेचोर दत्तात्रय घोडेचोर, जालिंदर घोडेचोर, यांनी आलेल्या महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केले.
प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुरुवर्य महंत, ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मा .सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर यांनी संतपुजन केले. यासाठी परिसरातील भजनी तसेच उदयन दादा गडाख व राजकीय ,शैक्षणिक ,धार्मिक ,कला ,क्रीडा ,साहित्य , अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊंचे आज वैकुंठगमन होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच विठ्ठल पांडुरंग चरणी प्रार्थना. करण्यासाठी अनेक मंडळींनी आपली श्रद्धांजली वाहिली. यानंतर माऊलीच्या पसायदानाने या सोहळ्याचा शेवट करण्यात आला.
भाऊंच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केल्याने परिसरामध्ये या परिवाराचे अभिनंदन व कौतुक होत आहे.