*देवळाली सोसायटी तोट्यात जायला ते शिस्तप्रियच जबाबदार..!* *देवळाली सोसायटी मधून त्या ५९ सभासदांचे सभासदत्व रद्द करा.* *- प्रहार चे आप्पासाहेब ढुस यांची मागणी.*

*देवळाली सोसायटी तोट्यात जायला ते शिस्तप्रियच जबाबदार..!*  *देवळाली सोसायटी मधून त्या ५९  सभासदांचे सभासदत्व रद्द करा.*  *- प्रहार चे आप्पासाहेब ढुस यांची मागणी.*

देवळाली प्रवरा - दि. २९ मार्च 

देवळाली सोसायटी तोट्यात जायला ते शिस्तप्रिय सभासदच जबाबदार असून त्या ५९ सभासदांचे सभासदत्व रद्द करा अशी मागणी प्रहारचे आप्पासाहेब ढुस यांची राहुरीचे सहाय्यक निबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

       देवळाली प्रवरा सोसायटी आणि बागायत पीक संस्था या एकच उद्देश व कार्यक्षेत्र असलेल्या दोन संस्थेत ते ५९ सभासद दोन्ही संस्थेत सभासद आहेत, पोटनियमातील तरतुदीनुसार एकच उद्देश व कार्यक्षेत्र असलेल्या दोन संस्थेत सभासद राहता येत नाही त्यामुळे त्या ५९ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी सभासदांनी तक्रार दाखल केली होती, त्यावर निकाल देताना कोणत्याही एका संस्थेत सभासद राहून दुसऱ्या संस्थेचा राजीनामा द्यावा असे निदेश राहुरीचे सहाय्यक निबंधक यांनी दिले आहेत. 

     तथापि देवळाली प्रवरा सोसायटी ही १९१७ साली स्थापन झाली असून बागायत पीक संस्था त्यानंतर तब्बल ४८ वर्षांनी म्हणजे १९६३ साली स्थापन झालेली आहे. बागायत पीक संस्थेची स्थापना झालेनंतर देवळाली सोसायटी मधील किराणा दुकान, कापड दुकान, इलेक्टरीक दुकान, रॉकेल दुकान असे विविध विक्री व्यवसाय बंद पडले आणि देवळाली प्रवरा सोसायटी तोट्यात गेली, पर्यायाने देवळाली सोसाटीच्या सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले, केवळ मध्यंतरीच्या काळात शासनाची कर्जमाफी आली म्हणून आज सोसायटी तग धरून आहे, पण तरीही लाभांश देऊ शकत नाही हे सभासदांचे दुर्दैव म्हणावे लागेल, दुसरीकडे मात्र या स्वतःला शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या सभासदांनी बागायत पीक संस्थेत स्वतःचे शेअर भांडवल वाढवून तिला नफ्यात ठेवली आहे. त्यामुळे केवळ देवळाली सोसायटी मोडीत काढण्यासाठीच यांनी दुसरी संस्था गावात उभी केल्याने देवळाली प्रवरा सोसायटीच्या हिताला बाधा पोहचेल असे काम या शिस्तप्रिय सभासदांनी केल्याने त्यांचे देवळाली प्रवरा सोसायटी मधून सभासदत्व रद्द करण्यात यावे असे निवेदनात ढुस यांनी शेवटी म्हंटले आहे.