माननीय अँड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन...

माननीय अँड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन...

अँड.डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन....... 

 

आव्हाने बु :- आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, जनशक्ती उद्योग समूह व जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्वच्या भूमिकेतुन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व अर्पण ब्लड बँक, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 रोजी सकाळी 9.00 वा. शेवगाव येथील निर्मलाताई काकडे आर्टस् अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव श्री.जगन्नाथ गावंडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. 

 

           यावेळी बोलताना श्री.गावंडे म्हणाले की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. समजतील प्रत्येक घटकानी रक्तदान केले पाहिजे. रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. प्रत्येक रुग्णांना रक्ताचा वेळेला पुरवठा होत नाही, पर्यायाने त्त्यांना आपला जीव गमवावा लागतो. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. 

 

मोठया सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत अथवा गरोदर स्त्रियांना

रक्त मिळाल्यास प्राण वाचण्यासाठी मदत होते. रक्तदान केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवून शरीराला चैतन्य निर्माण होत असते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून जास्तीत जास्त युवकाांनी रक्तदान करावे असे आवाहन यावेळी श्री. जगन्नाथ गावंडे यांनी केले.