महात्मा फुले कृषि विद्यापीठात जुनी पेन्शनसाठी कामबंद आंदोलनाला उर्त्फुत प्रतिसाद* *ध्याणधारना व प्राणायम करुन विद्यापीठाच्या कर्मचार्यांचे अनोखे आंदोलन*

महात्मा फुले कृषि विद्यापीठात जुनी पेन्शनसाठी कामबंद आंदोलनाला उर्त्फुत प्रतिसाद* *ध्याणधारना व प्राणायम करुन विद्यापीठाच्या कर्मचार्यांचे अनोखे आंदोलन*

राहुरी विद्यापीठ, दि. 16 मार्च, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी हे दि. 14 मार्च पासून जुनी पेन्शन योजना लागु व्हावी या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात अधिकारी व कर्मचार्यांची 4520 पदे मंजूर असून त्यातील 2349 पदे भरलेली आहेत त्यापैकी 1450 कर्मचारी हे डी.सी.पी.एस. धारक आहेत. म्हणजेच विद्यापीठातील 50 टक्के कर्मचारी हे कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे. यामुळे विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन, विस्तार, प्रशासन आणि विकास कामे ठप्प झालेली आहे. या आंदोलनामध्ये कृषि सहाय्यक संघटना, लिपीक वर्गीय संघटना, मागासवर्गीय सेवक संघटना, प्राध्यापक संघटना असे सर्व मिळून कर्मचारी मध्यवर्ती समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी कामबंद आंदोलनामध्ये उत्फुर्त सहभागी झालेले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून जुनी पेन्शनधारक अधिकारी व कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देवून विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला आहे. 

 सरकारला लवकर जाग यावी यासाठी कर्मचार्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ध्यानधारणा, प्राणायम करुन हे आंदोलन सुरु ठेवले आहे. यावेळी कर्मचार्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव व राहुरीचे तहसीलदार यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे. डी.सी.पी.एस. धारक कर्मचारी एकच मिशन जुनी पेन्शन अशा आशयाच्या टोप्या घालून विद्यापीठ परिसरामध्ये रोज रॅली काढतात. आजच्या आंदोलनात प्रा.डॉ. उत्तम कदम, कर्मचारी समन्वय संघ उपाध्यक्ष श्री. मच्छिंद्र बाचकर, सचिव कर्मचारी समन्वय संघ श्री. महेश घाडगे, कार्याध्यक्ष कर्मचारी समन्वय संघ श्री. दत्तात्रय कदम, डॉ. संजय कोळसे, श्री. गोरक्षनाथ शेटे, ह.भ.प. अशोक महाराज शेटे, श्री. गोरक्षनाथ चौधरी या वक्त्यांनी भाषणे दिली तर विविध समित्यांचे सदस्य श्री. देविदास घाडगे, श्री. दत्तात्रय चव्हाण, महेश तमनर, योगेश भिंगारदे, डॉ. अवधुत वाळूंज, श्री. गणेश मेहेत्रे, दिपक औटी, सौ. भारती बरे, तोडमल मॅडम, औताडे मॅडम, इथापे मॅडम, जयदिप खळेकर, सिध्दार्थ साळवे, प्रदिप कोळपकर, बाबासो अडसुरे, आप्पा चोपडे, मंगेश ताकटे, आदी सदस्यांनी विविध समित्यांमध्ये आंदोनलाचे नियोजन केले असून महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांचे मार्गदर्शनाखाली हे आंदोनल यशस्वीरित्या चालु आहे

.