चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुर चा घे भरारी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुर चा घे भरारी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल चा घे भरारी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा

         नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे घे भरारी सांस्कृतिक महोत्सव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

             कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेवासा गटशिक्षणाधिकारी श्री .शिवाजीराव कराड साहेब हे होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव डोईफोडे, श्री. मच्छीद्र महाराज निकम, प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू श्रीकांतभैय्या जाधव,संस्थेचे विश्वस्त अंबादास गोरे,मनोहर बनसोडे,सलाबतपुर चे सरपंच अझहर शेख, चाईल्ड करिअर चे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर,ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष श्री सुनील नजन,रवींद्र गावडे,निवृत्त मुख्याध्यापक राधाकिसन गोरे, गोंडेगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक संदीप फुलारी,शिवाजीराव वाबळे, डॉ.रवींद्र गोरे, आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

      शिस्त, संस्कार, संस्कृती, गुणवत्ता,व शिक्षण या पंच सुत्री वर काम करणाऱ्या या संस्थेतील विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील.व गावचे नाव उज्वल करतील असे प्रतिपादन गटशिक्षाधिकारी शिवाजीराव कराड यांनी केले.तर या शाळेच्या नावात करीअर असल्याने या मुलांना उज्वल भवितव्य आहे.असे मत नेवासा तालुक्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी मांडले.

              सदर कार्यक्रम प्रसंगी विविध स्पर्धात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध गीतावर बहारदार नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश हापसे व शांहरुख सय्यद यांनी केले.शेवटी आभार संदीप खाटीक यांनी मान

ले.