संपूर्ण देशात दि. २९/०३/२०२४ रोजी दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारा ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तम शुक्रवार ( गुड फ्रायडे ) हा सन मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला.

संपूर्ण देशात दि. २९/०३/२०२४ रोजी दया, क्षमा व  शांतीचा  संदेश देणारा ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तम शुक्रवार ( गुड फ्रायडे ) हा सन मोठ्या संख्येने साजरा  करण्यात आला.
संपूर्ण देशात दि. २९/०३/२०२४ रोजी दया, क्षमा व  शांतीचा  संदेश देणारा ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तम शुक्रवार ( गुड फ्रायडे ) हा सन मोठ्या संख्येने साजरा  करण्यात आला.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- संपूर्ण देशात दि. २९/०३/२०२४ रोजी दया, क्षमा व    शांतीचा  संदेश देणारा ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तम शुक्रवार ( गुड फ्रायडे ) हा सन मोठ्या संख्येने साजरा  करण्यात आला

        सर्व ख्रिस्ती धर्मग्रामातील चर्चने  सकाळी येशू ख्रिस्ताच्या दु:ख सहनाचा, क्रुसाच्या वाटेचा, भक्तीचा जीवंत देखाव्यात मोठ्या संख्येने सहभागिता घेत, या भक्तीमध्ये एकूण १४ स्थानांचा प्रसंग नाट्याद्वारे सादरीकरण केले गेले, त्या प्रत्येक प्रसंगा अन्वये जमलेल्या भाविकांना ह्रदयर्स्पशी मनन चिंतन करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. त्यावेळी जगात पाप फारच वाढत होते, येशू ख्रिस्ताने कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसतांनाही, केवळ तो सत्य सांगत होता, आजारी लोकांना बरे करत होता, तो दिन- दुबळ्यासाठी मदत करत होता, पाप करु नका, एकमेकांनी क्षमा करा. येशू म्हणत की, मी केवळ पापी लोकांसाठी आलो आहे. मात्र येशू केवळ आपल्या मानवाच्या पापाची भरपाईची किंमत म्हणून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी येशू  क्रुसावर मरण पावला आहे. म्हणून यापुढे पाप करुन येशूचे क्रुसाचे ओझे वाढवू नका, एकमेकांशी प्रेमाने वागा, क्षमा करा, आपल्या पापाचा पश्चाताप करा, शेजा-यांवर प्रीती करा, आपल्या हातून झालेल्या चुकांची, पापांची क्षमा मागावी, गरजूंना मदत, दान करावे, हा संदेश या भक्ती मधून जगभरातील भाविकांना दिला जातो. 

             क्रुसाच्या वाटेची भक्ती झाले नंतर येशू ख्रिस्ताला क्रुसावर खिळत असता उच्चारलेल्या सात शब्दावर भाविकांसाठी सोप्या भाषेत ह्रदयस्पर्शी प्रभावी प्रबोधन करण्याचे नियोजन केले जाते. मात्र हा संपूर्ण ४० दिवसांच्या उपवास कालावधीत दर बुधवार व दर शुक्रवारी चर्च मध्ये क्रुसाच्यावाटेची भक्ती केली जाते. एक किंवा दोन दिवसांची प्रार्थना सभा घेतली जाते. दि. २८ मार्च रोजी आज्ञा गुरुवारी शिष्याचे पाय धुतले जातात व एक नविन आज्ञा स्थापित केली गेली, येशू शिष्यांना म्हणाला की तुम्ही मला गुरू संबोधले आहे, मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही ही एकमेकांचे पाय धुतले पाहीजेत. आपल्या प्रेषितांचे पाय धुवून त्यांच्यावरील प्रीतीचे सेवेत रुपांतर केले व त्यांना प्रीतीची नविन आज्ञा दिली. याचे प्रतिक म्हणून निवडलेले १२ शिष्यांचे पाय धर्मगुरू धुतात हा आज्ञा गुरुवार संबोधला जातो.  या दिवशी येशुने पवित्र मिस्साबली व धर्मगुरूपद याची प्रस्थापना केली  या दिवशी उपवास असल्याने विधर्मीय तसेच धर्मग्रामातील दानशूर व्यक्ती एकत्रित येऊन सर्वांसाठी पाणी व उपवासाचे पदार्थ अन्नदान करतात. 

           येशूचे दु:ख सहन वाचन, सर्व भाविकांना क्रुसाचे चुंबन व ख्रिस्त प्रसादाचे वाटप हा धार्मिक विधी सर्व  मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.

        हा संपुर्ण कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी धर्मग्रामातील विविध ग्रुप, पॅरिशनर सर्व प्रकारचे सहकार्य आनंदाने करत असतात. वार्ताहार प्रतिनिधी  टिळकनगर धर्मग्राम चर्च, लोयोला धर्मग्राम चर्च, श्रीरामपूर, करुणा माता धर्मग्राम चर्च, पवित्र क्रुस तीर्थक्षेत्र, वैजापूर येथील कालची क्रुसाची वाट व  त्या नंतरचे धार्मिक विधी फारच भक्तीभावाने करण्यात आले असे कळविण्यात आले.