जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये कोपरगाव तालुक्यातील वाळू तस्कर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध .

जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशान्वये कोपरगाव तालुक्यातील वाळू तस्कर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध .

 

कोपरगाव तालुक्यातील वाळु तस्कर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द.. जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर याचे आदेश...

 

            प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, योगेश संजय कोळपे, वय ३२ वर्षे, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर याने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१५ ते २०२३ या कालावधीत गैर कायदयाची मंडळी जमवुन शिवीगाळ करुन मारहाण करणे, दरोडा घालुन माहरहाण करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासनाची फसवणुक करुन गौणखनिजाची उत्खनन करणे तसेच सरकारी नोकरावर हल्ला करुन दुखापत करुन शासकीय वाळु चोरीचे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे दखलपात्र गुन्हे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण करुन केलेले होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार व वाळु तस्कर योगेश कोळपे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक, संदिप कोळी, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी एमएपीडीए कायदयान्वये प्रस्तावर तयार करुन उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांच्या मार्फत मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना सादर केला होता.

            सदर प्रस्तावाची राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांना सादर केला होता. सराईत गुन्हेगार योगेश कोळपे याचे विरुध् गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

           वरील प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांनी पडताळणी करुन अहमदनगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी करीता सराईत गुन्हेगार नामे योगेश संजय कोळपे वय ३२, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यास स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्याप्रमाणे पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.

 

           सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई / तुषार धाकराव, सफौ / बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ रविंद्र पांडे, सुरेश माळी, गणेश भिंगारदे, पोकॉ / रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड व चापोकॉ / अरुण मोरे यांनी केली असुन कोपरगाव तालुका पो.स्टे. नेमणुकीचे सफौ / सुरेश गागरे, पोकॉ / जयदिप गावारे यांनी परीश्रम घेतलेले आहेत.

             अहमदनगर जिल्हयामध्ये आचरसंहितेच्या काळात सराईत गुन्हेगार, वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळी विरुध्द प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत मा. श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर व राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी दिलेले आहेत.