मकर संक्रांत निमित्त बालाजी देडगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मकर संक्रात निमित्त कैलासवासी संदीप वांढेकर यांच्या स्मरणार्थ व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वर्षापासून जनकल्याण रक्तपेढी या रक्तपेढीच्या सहकार्याने याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 9 वाजता या शिबिराचे उद्घाटन प्रमूख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तरुण वर्गातील रक्तदात्यांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला व 46 रक्तपिशव्या संकलन करण्यात आल्या.
या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामपंचायत , बजरंग दल व ग्रामस्थ यांच्यावतीने जनकल्याण रक्तपेढीतील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर विलास मढीकर यांनी आपल्या मनोगत अजून हे गाव अतिशय परंपरा टिकून ठेवणार ,गेली पंधरा वर्षापासून अखंड या शिबिराचे नियोजन केले जाते .व दरवर्षी रक्तपिशव्याचे प्रमाण वाढत जाते .खेडेगावी अजूनही लोकांची मानसिकता नाही तरीही या गावातील बजरंग दल व ग्रामस्थ पुढाकार घेऊन अतिशय पुण्याचे काम करत आहेत व आमचा जो काही सन्मान केला त्याबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी शिवाजी तांबे, नारायण मुंगसे, मुरलीधर मुंगसे , सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता मुंगसे , दिव्यागभुषण भाऊसाहेब सावंत,देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे, शिक्षक बँकेचे माजी सदस्य राजेंद्र मुंगसे, माजी चेअरमन संतोष तांबे, युवा नेते संभाजी काजळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, भारत कोकरे,चाईल्ड करीयर स्कूल चे संस्थापक सागर बनसोडे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे,उप अध्यक्ष शिवाजी काजळे व सर्व सदस्य जलकंद जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर रोहन आडकर, महेंद्र तोरवेकर ,प्रियंका आढागळे ,सुलभा पवळ ,किशोर यादव, बाळू खरपुडे व बजरंग दलाचे बाबू मुंगसे, इंजिनीयर महेंद्र मुंगसे, गणेश औटी, राऊ मुंगसे, ज्ञानेश्र्वर मुंगसे, सोपान मुंगसे, सचिन मुंगसे, महादेव पुंड, बंडू कुटे, शिवाजी मुंगसे, दत्तात्रय कदम, अशोक मुंगसे उध्दव वांढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर बजरंग दल व ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले.