अरुणाचल रणजी क्रिकेट संघामध्ये अभिषेक पुजारी ची निवड झाल्याबद्दल बेलापूर खुर्द मध्ये भव्य सत्कार सत्कार

किशोर भगत

अरुणाचल रणजी क्रिकेट संघामध्ये अभिषेक पुजारी ची निवड झाल्याबद्दल बेलापूर खुर्द मध्ये भव्य सत्कार सत्कार

बेलापूर खुर्द चे भूमिपुत्र असलेले अभिषेक दत्तात्रेय पुजारी यांची अरुणाचल रणजी क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे त्याबद्दल  बेलापूर खुर्द च्या नागरिकांच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . जेटीएस हायस्कूल बेलापूरचे प्राचार्य असलेले दत्तात्रय पुजारी सर यांचे अभिषेक हे पुत्र आहे त्यामुळे या सत्कार समारंभाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात अभिषेक चे आई वडील तसेच श्रीरामपूर येथील साई क्रिकेट क्लबचे त्याचे कोच असलेले महेश बोरावके सर आणि बेलापूर खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक बाराहाते तसेच सदस्य नैना बडदे , प्रणाली भगत आणि बेलापूर खुर्द विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक पुजारी तसेच त्याचे आई-वडील आणि त्याचे कोच यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अभिषेकचे वडील दत्तात्रय पुजारी सर यांनी अभिषेक लहानपणापासूनच क्रिकेट बद्दल घेत असलेली मेहनत आणि त्याचं खेळण्यातील सातत्य आणि हार न मानता खेळत राहण्याची त्याची जिद्द याच्या जोरावरच त्याचं रणजी मध्ये पदार्पण झाला आहे असं सांगितले , यावेळी अनेक अनुभव कथन करताना त्यांचे मन भारावून गेले होते .यावेळी शिक्षक असलेल्या अभिषेकच्या आई यांनी आपल्या मनातील व्यथा आणि आनंद व्यक्त करताना म्हणाल्या की अरुणाचल आणि आसाम सारख्या प्रदेशांमध्ये गेले पाच वर्ष सातत्याने अभिषेक करत असलेली मेहनत आणि इतक्या दूरवर आपल्या मुलाला पाठवल्याबद्दल होणारी मनाची घालमेल या सर्वावर त्याने आज मात करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न तसंच त्याच्या स्वतःचाही स्वप्न साकार केले आहे,याचाच आम्हाला सर्वांना अभिमान आहे .यावेळी त्यांनी अभिषेकच्या  जीवनात आलेले अनेक वाईट प्रसंग आणि त्यावर त्यांनी केलेली मात हे सुद्धा त्यांनी  कथन केले. आपल्या भाषणामध्ये अभिषेक चे कोच महेश बोरवके यांनी अभिषेकची असलेली खेळण्याची लखब आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी कठोर मेहनत घेत रणजी मध्ये केलेलं पदार्पण याविषयी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने उपसरपंच दीपक बाराहाते बी एम पुजारी साहेब तसेच प्रणाली भगत आणि गोरख दादा भगत यांनी भाषणातून  शुभेच्छा दिल्या. यावेळी नयनाताई  बडदे आणि प्रशांत बडदे यांचे चिरंजीव आरुष हे सुद्धा महेश बोरावके यांच्या अधिपत्याखाली मार्गदर्शन घेत पुण्यातील मेट्रो क्लब कडन खेळण्यासाठी निवडले गेले त्यामुळे त्यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आलं. शेवटी अभिषेक याने आपलं मनोगत व्यक्त करताना हरिहर केशव गोविंदांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांचे पाठबळ तसेच सर्व गावकऱ्यांच्या शुभेच्छा आणि खंबीर साथ यामुळे आयुष्यातील एक मोठे स्वप्न साकार करता आलं असं असं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्र क्रमाचे सूत्रसंचालन किशोर भगत यांनी केले