मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना उद्योजिका बनविणार -प्रशांत लोखंडे
मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना उद्योजिका बनविणार - प्रशांत लोखंडे
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे,शेतकरी सेनेचे राज्य प्रमुख धनंजय जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सरपंच लीलाताई गायकवाड, सुवर्णा करपे, कवाने ताई,सुभाष जूंदरे,विजय तोडमल,जुगल गोसावी,शिंदे,बाळासाहेब जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पायल बोबडे यांनी केले.या प्रसंगी सरपंच लिलाताई गायकवाड,शिवसेना महिला आघाडी ता.प्रमुख वनिता ताई जाधव,सुभाष जुंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी युवा नेते प्रशांत लोखंडे म्हणाले की,महिलांनी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजनांचा लाभ घ्यावा.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये महिलांसाठी योजना आणल्या आहेत.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी ३५% सबसिडी तर शहरासाठी २५ % सबसिडी आहे.महिलांनी शेती पूरक व्यवसायात प्राधान्याने उतरावे.ग्रामीण भागातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत असताना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधावा.तसेच महिलांनी छोट्या उद्योगातून तयार होणारी उत्पादनांना बाजार पेठ उपलब्ध करून दिली जाईल असे लोखंडे म्हणाले.
या प्रसंगी धनंजय जाधव म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांच्या माध्यमातून अनेक महिलांना मोठी मदत झाली आहे.शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोठ्या शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मोठे मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे असे जाधव म्हणाले.
शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले की महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.लाडकी बहिण योजनेचा ज्या बहिणींनी लाभ घेतलेला नाही त्यांनी तात्काळ अर्ज करावा व योजनेचा लाभ घ्यावा.शासकीय योजनेचा लाभ घेताना लाभ मिळवताना कुठलीही अडचण भासल्यास शिवसैनिकांना संपर्क साधावा असे लांबे म्हणाले.