पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनिला राष्ट्रीय पुरस्कार म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी दि.23 मार्च 2022
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला राष्ट्रीय पुरस्कार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 23 मार्च, 2022*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयाच्या कु. अक्षता अन्नदाते या विद्यार्थिनीने कृषि क्षेत्रातील छोट्या मराठी भाषेतील तयार केलेल्या शेती या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हैदराबाद येथील मॅनेज या संस्थेतर्फे भारतातील वेगवेगळ्या भाषेतील कृषि क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या छोट्या फिल्म साठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये भारतातील 20 राज्यातून 107 स्पर्धकांमधून 11 भाषांमधील 273 फिल्म आल्या होत्या. या सर्व फिल्म मधून 11 भाषातील 16 कृषि फिल्मसाठी पुरस्कार देण्यात आले. मराठी भाषेतील शेती या उत्कृष्ट मराठी भाषेतील शॉर्ट फिल्म साठी कु. अक्षता अन्नदाते हिला कर्नाटक राज्याचे कृषि मंत्री श्री. बी.सी. पाटील व मॅनेज संस्थेचे महासंचालक डॉ. पी. चंद्र शेकरा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मॅनेज, हैदराबाद येथे गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी कु. अक्षता अन्नदाते हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, प्रा. कीर्ती भांगरे व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनीही अभिनंदन केले.