अहमदनगर शहरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात. 1 गावठी कट्टा व 1 जिवंत काडतुस जप्त .
दिल्ली 91 न्युज
अहमदनगर शहरामध्ये विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात. 1 गावठी कट्टा व 1 जिवंत काडतुस जप्त .
पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 10/10/2023 रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अनिकेत राजेंद्र वडागळे रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर हा त्याचा कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने तारकपुर ते रामवाडी जाणाऱ्या रोडने फिरत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ/विजय वेठेकर, पोना/रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण यांना तात्काळ सदर इसमाची माहिती काढुन त्यास ताब्यात घेणेबाबत सुचना देवुन रवाना केले.
पोलीस पथकाने तारकपुर ते रामवाडी रोडला सापळा लावुन त्या ठिकाणी एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत राजेंद्र वडागळे वय 24 वर्षे, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 30,000/- रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व 500/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस, तसेच 50,000/- रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक ऍ़क्सेस मोटारसायकल असा एकुण 80,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. त्याचेकडे गावठी कट्टयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा कट्टा विक्री करण्याकरीता आणला असल्याची कबुली दिली आहे.
अनिकेत राजेंद्र वडागळे वय 24 वर्षे, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर, जि. अहमदनगर हा वरीलप्रमाणे 01 गावठी कट्टा, 01 जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोना/185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर तोफखाना पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 1485/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोस्टे करीत आहे.
आरोपी अनिकेत राजेंद्र वडागळे याचेविरुध्द यापुर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना पोलीस स्टेशन 4801/2020 भा.द.वि.कलम 302 प्रमाणे
सदर कारवाई . राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.