सांगली जिल्ह्यातील पेडगावच्या शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठ राहुरी येथे भेट.
*राहुरी विद्यापीठ, दि. 14 ऑक्टोबर, 2024*
कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाचे शेतीच्या डिजीटलायझेशनचे आणि हवामान अद्ययावत व पाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय वाखणन्यासारखे आहे. कृषि विद्यापीठातील संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प हा शेतकर्यांना दिशादर्शक आहे असे प्रतिपादन पेड गावचे सरपंच श्री. प्रदिप चव्हाण यांनी केले.
सांगली येथील पेडगावच्या ग्रमस्थांनी नुकतीच महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेट दिली व शेतीचे तंत्रज्ञान जाणुन घेतले. या ग्रामस्थांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी स्वागत केले व विद्यापीठाच्या कार्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी प्रतिक्रिया देतांना सरपंच श्री. प्रदिप चव्हाण बोलत होते. यावेळी पेडगावच्या ग्रामस्थांनी कास्ट प्रकल्पास, ड्रोन प्रकल्पास, अद्ययावत हवामान केंद्र, संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्पास भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनील शेंडगे म्हणाले विद्यापीठाचा ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे काम उलेखनीय आहे. आजकाल ड्रोनचा शेतीत वापर होऊ
लागला आहे. ड्रोनमुळे औषधाची आणि वेळेची बचत होते. कमी खर्चात व कमी वेळेत शेतीची कामे होत असल्यामुळे ड्रोन तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी फायदेशीर दिसून येत आहे. ड्रोनचा शेतीमधील वापर या संदर्भातील फार चांगली माहिती या ड्रोन प्रकल्पातून कळाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. मदन शेंडगे, श्री. मनोहर पाटील, श्री. निलेश शेंडगे, श्री. राजेंद्र शेंडगे, सोसायटी सदस्य श्री. दिलीप शेंडगे, श्री. विकास शेंडगे, श्री. अमोल शेंडगे व इतर ग्रामस्थांचा सहभाग होता. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन यांनी या भेटीचे नियोजन केले व प्रकल्पांसंदर्भात शेतकर्यांना माहिती दिली.