बेलवंडी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत 13 वेठबिगार कामगारांची मुक्तता .

बेलवंडी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत 13 वेठबिगार कामगारांची मुक्तता .

बेलवंडी पोलीसांची ऑपरेशन मुस्कान मोहिमे अंतर्गत 13 वेठबिगार कामगारांची मुक्तता .

 

    बेलवंडी पो.स्टे गु.र.नं 509/22 भादवी 302,201 हा गुन्हा 30/11/2022 रोजी सुरेगाव शिवारात पोत्यात मिळालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपासात व गु.र.नं 648/23, माधवी 395, 120ब प्रमाणे दाखल गुन्हयातील गुन्हेगारांनी दिल्ली येथील फिर्यादीचा भाऊ येरवडा जेलमध्ये असताना त्यास जामीनास मदत करण्यासाठी आमची न्यायाधीशांच्या कार्यालयातील स्टेनोशी ओळख असून पाच लाख रुपये दिल्यास जामीन करून देऊ असा विश्वास देऊन फिर्यादीस 6/12/2023 रोजी चिखली घाटाजवळ बोलावुन चिखली कोरेगाव रोडपासुन काही अंतरावर माळरानावर दरोडा टाकून लुटलेले आहे.

 

        पोलीस स्टेशन कडील दाखल दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करत असताना गोपनीय माहिती मिळाली की श्रीगोंदा तालुक्यातील काही गुन्हेगार हे त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या गुन्हेगार साथीदारांच्या घरगुती कामाकरिता तसेच शेळ्या मेंढ्या, गुरे सांभाळण्याकरिता व शेतात काम करून घेण्याकरिता देशातील विविध रेल्वे स्टेशन वरून निष्पाप नागरिकांना बळजबरीने आणून त्यांना मारहाण करून, अर्धवट उपाशी ठेवून,वेळप्रसंगी त्यांच्या खाण्यामध्ये गांजा सारख्या नशिल्या पदार्थांचा वापर करून त्यांच्याकडून वेठ बिगाराप्रमाणे काम करून घेतात. त्यामुळे त्यांना ड्राफ्ट /दरोडा घरफोडी/ सारखे गुन्हे स्वतः किंवा त्यांच्या साथीदारांसोबत करणे सोपे होते. तसेच गुन्हा केल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यास पळून जाताना त्यांचे घरगुती काम त्यांचे कुटुंबीय सदर वेठबिगारांमार्फत करून घेतात.

 

            सदर वेठबिगारांचा मारहाणीत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट पोत्यात भरून निर्जन स्थळे केल्या जाते ज्यामुळे पोलीस यंत्रणा अनोळखी इसमाच्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात व्यस्त होते आणि त्यामुळे सदर गुन्हेगारांनी केलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना प्राधान्य देता येत नाही. अशा प्रकारचे बळजबरीने आणलेले वेठ बिगार आजही बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची 4 स्वतंत्र पथके तयार करुन बेलवंडी पो.स्टे हददीत रवाना करण्यात आले. त्याप्रमाणे आरोपी नामे 1) चारुशिला रघुनाथ चव्हाण 2) रघुनाथ रायफल चव्हाण 3) झिलुर रायफल चव्हाण 4) अमोल गिरीराज भोसले 5) आबा जलिंदर काळे 6) दालखुश मुकींदा काळे 7) नंदु किलचंद गव्हाणे 8) सागर सुदाम गव्हाणे 9) आब्बास संभाजी गव्हाणे 10) सचिन जयसिंग गव्हाणे 11) काळुराम पाटीलबा पवार यांचेविरुध्द भा.द.वि.कलम- 367,370,342,323,504,506,34 वेठबिगार अधिनियम कायदा कलम 16 प्रमाणे गुन्हा दाखल करुन यातील पिडीत नामे 1) बबलु (नाव व गाव महित नाही) 2) नरशिम (नाव व गाव महित नाही) 3) कल्लु (नाव व गाव महित नाही) 4) सिध्दीश्वर (नाव व गाव महित नाही) 5) महिला (मुकी) (नाव व गाव महित नाही) 6) प्रकाश भोसले (पुर्ण पत्ता महित नाही) 7) वसिम (नाव व गाव महित नाही) 8) मन्सुर अली (नाव व गाव महित नाही) 9) गणेश (नाव व गाव महित नाही) 10) प्रविण (नाव व गाव महित नाही) 11) विरसिंग (नाव व गाव महित नाही) 12) दत्तात्रय नागनाथ कराळे (गाव महित नाही ) 13) दादाभाई रामन ठाकरे यांची मुक्तता करण्यात आले. 

 

 

         अश्या प्रकारे गोपनिय महितीच्या आधारे बेलवंडी पो.स्टे हददीत 8 ठिकाणी छापे टाकुन विविध भागातील एकुण 12 पुरुष व 1 महिला (वेठबिगार) यांना मुक्त करुन 8 गुन्हे दाखल केले आहे.व सदर गुन्हयातील 11 आरोपीपैकी 5 आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे. 

 

       सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी सो कर्जत विभाग कर्जत, यांचे मागदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान मोहिमे अंतर्गत पो.नि.श्री.संजय ठेंगे, पो.स.ई. मोहन गाजरे,स.फौ.मारुती कोळपे,रावसाहेब शिंदे,पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर,पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे,चा.पो.हे.कॉ. भाऊ शिंदे,पोहेकॉ हसन शेख,पोहेकॉ भाउसाहेब यमगर,पोहेकॉ झुंजार,पोहेकॉ जायकर, मपोना वलवे, मपोना काळे,मपोना अविंदा जाधव पो.ना. शरद गागंर्डे, पो. ना.जावेद शेख,पो.कॉ. विनोद पवार,पो.कॉ,कैलास शिपनकर,पो.कॉ. संदिप दिवटे, पो.कॉ. सतिष शिंदे,पोकॉ विकास सोनवणे, मपोकॉ धावडे, अश्विनी शिंदे,यांनी केली आहे .

 

 

          श्रीगोंदा तालुक्यातील व बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील जनतेला आव्हान करण्यात येते की, वेठ बिगार प्रथा हि कायदयाने बंद असल्याने अशा प्रकारे कोणी मानवी तस्करी करुन अनोळखी इसमांना डांबुन ठेवनु घरातील तसेच शेतातील काम करण्यास भाग पाडत असेल वा त्यांचे मार्फतीने भिक मागवत असतील तर खालील नंबरवर संपर्क साधावा. तसेच विटभटटी मालक, बागायदार हॉटेल चालक, गॅरेज वाले तसेच इतर आस्थापना चालक यांचेकडे परप्रांतीय किंवा परजिल्हयातील मजुर कामावर असल्यास त्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकॉर्ड) याची माहिती आपणाकडे ठेवावी तसेच त्यांचे मुळ गावी त्यांचे पुर्व चारीत्र्याबाबत खात्री करुन सदर मजुरांबाबत कामगार आयुक्तांना माहिती पुरवावी.