महात्मा फुले कृषी विद्यापीठात जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी कर्मचार्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु*
*राहुरी विद्यापीठ, दि. 14 डिसेंबर, 2023*
जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, मुंबई या संघटनेशी सलग्न असलेल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघ यांनी आजपासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात नविन पेशंनमध्ये (एन.पी.एस.) समाविष्ठ असलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज झालेल्या आंदोलनात या कर्मचार्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत भव्य रॅली काढली. या ठिकाणी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचार्यांनी एकच मिशन-जुनी पेशंन अशा घोषना दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी बाईक रॅलीने राहुरी येथे गेले. त्या ठिकाणी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने पोलिस निरिक्षक श्री. सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. हे आंदोलन महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. संजय कोळसे, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय कदम, श्री. बाबासाहेब अडसुरे, श्री. पाडुरंग कुसळकर, सचिव श्री. देवीदास घाडगे, महिला प्रतिनिधी श्रीमती शितल जगदाळे, श्रीमती रेखा गोसावी, माधुरी औताडे, डॉ. प्रकाश मोरे, श्री. देवेंद्र वंजारे आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्यांनी तेथील प्रमुख अधिकार्यांना संपाबाबतचे निवेदन दिले व संपूर्ण दिवसभर ठिय्या आंदोलन केले.