वनविभागाची दमदार कामगिरी राहत्या घरातून सांभर प्रजातिची शिंगे व जबडा जप्त, पितापुत्रावर गुन्हा दाखल .
वनविभागाची दमदार कामगिरी राहत्या घरातून सांभर प्रजातीची शिंगे व जबडा जप्त.पित्ता पुत्रावर गुन्हा दाखल .
घरातील हॉलमध्ये अथवा बंगल्यांच्या बैठक खोलीत, दर्शनी भागात शोभेची वस्तू अथवा बडेजाव म्हणून काहींना जंगली प्राण्यांची शिंगे, दाते, हाडे, कातडे, सांगाडा, मुखवटे लावण्याचा शौक असतो. मात्र हाच हव्यास आपल्याला किती भारी पडू शकतो याची प्रचिती थेरगावातील एका उद्योजकावर आली. त्याने घरात सांभर प्रजातीच्या प्राण्याची शिंगे व तोंडाचा सांगाडा लावल्याने मुळशी वनविभागाने त्याच्या घरावर छापा मारत कारवाई केली.
मुळशीच्या वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 31जानेवारी रोजी थेरगावातील शिव कॉलनी लेन नंबर २बी, मधील सुरेश आप्पा नाईक धनश्री बंगलोवर मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण तसेच घोटावडे येथील वनपाल यांच्यासह वनविभागाच्या पथकाने धाड मारून घराची झडती घेतली असता, सांभर प्रजातीच्या वन्यप्राण्याची शिंगे तोंडाच्या सांगाड्यासह आढळून आली. प्रथमदर्शनी सदर शिंगे लाकडापासून तसेच पीओपी असून घरामध्ये शोपीस म्हणून बनवून लावलेली असा बनाव निर्माण करण्यात आला.परुंतु तपासणी केली असता सदरची शिंगे ही सांबर या प्रजातीचीच असून आरोपीला ताब्यात घेतले असता शिंगे हे वीस वर्षापासून घरामध्ये असल्याचे कबूल केले .आरोपी यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972चे कलम 39,50,51 नुसार करण्यात आला असून सदरची कारवाई मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल घोटावडे, प्रज्ञा बनसोडे, वनरक्षक पांडुरंग कोपणार, संतोष मुंडे इतर कर्मचाऱ्यांनी केली असूू नपुढील तपास उपवन संरक्षक पुणे वन विभागपुणे श्री राहुल पाटील, तसेच सहा वनसंरक्षक पुणे श्री मयूर बोठे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण तपास करीत आहे .
वन्य जीवाची शिकार करणे, तस्करी करणे किंवा वन्यजीवांचे अवशेष जवळ बाळगणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा असून 7 सात वर्षे पर्यंत कारावासाची शिक्षा , द्रव्य दंड किंवा दोन्ही होऊ शकते . अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क करा
तसेच वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 वर कळवा असे अवाहन संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी पौड यांनी केले आहे .