*विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषि शिक्षण क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*

*विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषि शिक्षण क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*

*क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने स्फुर्ती आणि धैर्य निर्माण होते*

*- अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण*

*राहुरी विद्यापीठ, दि. 31 जानेवारी, 2023*

 क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नसुन त्यात सहभाग घेणे महत्वाचे आहे. स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे जीवनात स्फुर्ती, धैर्य, संघभावना निर्माण होते. स्पर्धेत एकमेकांबद्दल चुरस, आस्ता, प्रेम निर्माण होते. शरीर सुदृढ ठेवायचे असतील आणि एकाग्रता वाढवायची असेल तर एका क्रीडा प्रकारात नैपूण्य असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले. 

 महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषि शिक्षण क्रीडा स्पर्धा 2022-23 च्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, नियंत्रक श्री. विजय पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, काष्टी येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापनचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ शिंदे, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य डॉ. राहुल देसले, डॉ. कुमार गुरव, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. मधुकर बेडीस, डॉ. मोहन शिर्के, डॉ. जे.डी. जाधव, डॉ. एस.के. कांबळे उपस्थित होते. 

 यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. श्रीमंत रणपिसे म्हणाले की या क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सर्व विद्यार्थ्यांनी पंचांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण झाल्याचे जाणवले. डॉ. महाविरसिंग म्हणाले आम्ही आमच्या कॉलेज जीवनात क्रीडा स्पर्धेत कायम सहभाग नोंदविल्यामुळे आम्ही घडलो तसेच तुम्हीपण घडा. विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेवून त्याचा आनंद लुटा. यावेळी कृषि तंत्र विद्यालय, जळगावचे प्राचार्य डॉ. मधुकर बेडीस, कोल्हापूर जिल्ह्याची विद्यार्थीनी कु. नंदिनी नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

 या विद्यापीठस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये खो-खो क्रीडाप्रकारामध्ये मुलांच्या संघात धुळे-नंदुरबार जिल्हा विजयी ठरला तर जळगांवचा जिल्ह्याचा संघ उपविजेता ठरला. मुलींच्या संघात कोल्हापूर जिल्हा विजयी ठरला तर उपविजयी अहमदनगर जिल्हा ठरला. हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये मुलांच्या संघात कोल्हापूर जिल्हा विजयी तर अहमदनगर जिल्हा उपविजयी ठरला आणि मुलींच्या संघात सातारा जिल्हा विजयी तर जळगाव जिल्हा उपविजयी ठरला. बक्षीस वितरणाचे वाचन श्री. भाऊसाहेब बेल्हेकर यांनी केले. या क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातून 450 विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल देसले यांनी केले तर आभार डॉ. अविनाश गायकवाड यांनी मानले.