महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी राजेंद्र देसाई तर शहराध्यक्षपदी अमोल कदम यांची निवड. .! !
श्रीरामपूर
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिर्डी याठिकाणी जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पत्रकार बांधवांच्या हिताचे निर्णय तसेच पत्रकार बांधवांना येणाऱ्या अनेक अडचणी आरोग्य विषयक अडचणी या सर्व घेऊन शासन दरबारी विविध प्रकारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव अरोटे यांनी मांडले. संघटना मजबूत होण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना एकत्र करून विविध ठिकाणच्या कमिट्या या ठिकाणी त्यांची नेमणूकी साठी शिफारस शासन दरबारी करणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकार संघटनेचे प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव अरोटे, प्रदेश कार्यकारी सदस्य निळकंठ कराड ,जिल्हाकार्याध्यक्ष अरुण सोळकर, तर जिल्हाध्यक्ष अनिल राणे,दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते,जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, विद्याचंद सातपुते,जिल्हाअध्यक्ष प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे,जिल्हासचिव चंद्रकांत सुरंगे,पारनेरचे तालुकाध्यक्ष दत्ताजी घाडगे,श्रीगोंदा तालुकाअध्यक्ष अंकुश शिंदे,कर्जत तालुकाअध्यक्ष मुन्ना पठाण,जामखेड तालुकाअध्यक्ष दिपक देशमाने,पाथर्डी तालुकाअध्यक्ष तुळशीराम मुखेकर,शेवगाव तालुकाअध्यक्ष रावसाहेब मरकड, राहुरी तालुकाअध्यक्ष अशोकराव काळे, राहाता तालुकाअध्यक्ष राजकुमार जाधव,कोपरगाव तालुकाध्यक्ष मनीष जाधव,नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड,संगमनेर तालुकाअध्यक्ष संजय गोपाळे, अकोला तालुकाध्यक्ष अशोक उगले,गणेश आंबिलवादे,गौरव शेटे,चंद्रकांत झुरन्गे,दत्ता पाचपुते, निळकंठ कराड ,प्रस्तावित दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्त्ताजी पाचपुते यांच्या उपस्थीत सर्वानुमते तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र देसाई तर शहराध्यक्षपदी अमोल कदम यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव चंद्रकांत सुरंगे यांनी केली तर आभार राहत्याचे तालुकाअध्यक्ष राजकुमार जाधव यांनी मानले. .!!