बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने ग्रामरोजगार सहाय्यक यांना कामावरून केले कमी!
बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने ग्रामरोजगार सहाय्यक यांना कामावरून केले कमी!
१)पंचायत समिती माजलगाव, जिल्हा बिड.२) पंचायत समिती वडवणी, जिल्हा बिड, ह्या दोन्ही पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय,
बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने, दोन्ही पंचायत समिती मधील एक - एक ग्रामरोजगार सहायक यांना तेथील ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन कामावरून कमी केले आहे, आणि बेकायदेशीर काम करणेसाठी दुसऱ्या ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे, संबंधित प्रकरणी दोन्ही तालुक्यातील तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले होते, पण दोन्ही ठिकाणी त्या त्या गावातील ग्रामरोजगार सेवक यांचेकडे बेकायदेशीर होत असलेल्या कामाचे फोटो, विडिओ,जीओ टॅगींग केलेले फोटो इत्यादी पुरावे उपलब्ध आहेत, तरी निवेदन दिले पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामरोजगार सेवकांना कामावरून कमी करण्यात आलेले आहे, त्या दोन्ही तालुक्यातील, दोन्ही ग्रामरोजगार सेवकांना पुन्हा ग्रामसभा घेऊन, नियुक्ती करण्यात यावी, पुन्हा कामावर घेण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे बेमुदत काळासाठी बंद करून आंदोलन करण्यात येईल, तोपर्यंत दिनांक २६ जानेवारी२०२५ पासून मी सोनी शर्मा, ग्रामरोजगार सेवक तथा राज्य प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना एन जी पी ५१०२, गाव वडाळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे आमरण उपोषणाला बसणार आहे.