सि.टी.फौंडेशन व सी.टी.इंडिया न्युज महाराष्ट्र राज्याचा "राष्ट्रीय महिला पुरस्कार २०२३''सोहळा "सांगलीत'' संपन्न*
सांगली
सि.टी.फौंडेशन व सी.टी.इंडिया न्युज महाराष्ट्र राज्याचा "राष्ट्रीय महिला पुरस्कार २०२३''सोहळा "सांगलीत'' संपन्न* BPS Live News network सांगली:-(गौतम प्रज्ञासूर्य सर) पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक, व्यावसायिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात बहुजनांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी २०२०-२१ मध्ये स्थापन झालेल्या सी.टी.इंडिया मराठी न्यूज व सी.टी.फौंडेशन, महाराष्ट्र राज्य, संपादकीय, संस्थापक अध्यक्ष मा.तुकाराम सुतार, उपसंपादक श्रीमती निता पाटील (मॅडम), संस्थापक सदस्या कु.सानिका सुतार, विधी.सल्लागार अॅड. समिर पटवर्धन यांच्या कुशल नेतृत्वाखाली "जागतिक महिला दिनाचे''औचित्य साधून "महिला सन्मान,भारत स्वाभिमान''या ब्रिदवाक्याला अनुसरून भारतीय महिलांच्या प्रश्नाला, न्याय देण्यासाठी , कार्यरत असणाऱ्या आणि पडद्यामागे राहून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक, शासकीय पातळीवर कार्य करणाऱ्या ५० "महिलांना राष्ट्रीय पुरस्कार २०२३'' देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान सदर पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सांगली माहेर हाॅस्पिटल च्या प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.आशा गाजी(वठारे )मॅडम यांचा शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आढावा संपादकीय संस्थापक अध्यक्ष मा तुकाराम सुतार यांनी घेतला.तर डॉ.आशा गाजी मॅडम यांनी "महिलांचे समाजातील योगदान''संबंधी काव्यात्मक मांडणी करून उपस्थित महिलांच्या मध्ये"ऊर्जा''निर्माण केली. तर उपसंपादक श्रीमती निता
पाटील मॅडम यांनी महिलांच्या समस्याचा आढावा घेताना येणाऱ्या मराठी नववर्षात "लाचार,पिडीत, निराधार, निराश्रित,परितक्त्या विभक्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी,"मुक्त निवारा केंद्र''सुरू करण्याचे मनोदय व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अँकरिंग केलं आहे सिटी इंडिया न्यूज मराठीच्या मुंबई उपसंपादक व सिटी फाउंडेशनच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रीती जाधव यांनी सदर प्रसंगी माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली जिल्हा,प्रा गौतम प्रज्ञासूर्य सर यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा संपन्न होण्यासाठी स्वागतोत्सूक सौ प्रियांका चव्हाण सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादिका व सिटी फाउंडेशन जिल्हाध्यक्ष जळगाव श्री व सौ. हसमुख मखवाना (मुंबई)श्री प्रकाश अनंत(पूणे)श्री. विजयकुमार देशपांडे (पुणे),श्री .रविंद्र खेडेकर सौ.मंगला खेडकर(नागपूर) श्री राजू नानवटकर नागपूर श्री सुरेंद्र खेडेकर (अमरावती) सांगलीचे सौ राजश्री सुतार कुलदीपसिंह भाटिया आदी सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत"विश्वकर्मा हॉल (कालिका मंदिर) सांगली येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.