तालुका काटोल, जागृत पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत तपासणी..!!

तालुका काटोल, जागृत पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत तपासणी..!!

        महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारी पासून 'जागरूक पालक सुदृढ बालक' विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

 काटोल -आज दि.09/2/2023 रोज गुरुवार ला प्रा.आ.केंद्र ,कचारीसावंगा ता.काटोल येथे आरोग्य शिबीर तसेच " जागरूक पालक सुदृढ बालक " अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष तथा जनआरोग्य समिती चे सदस्य चंद्रशेखर चिखले यांचे हस्ते करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संजयजी डांगोरे सभापती पं .स. काटोल हे होते तर माअनुराधाताई खराटे माजी सभापती प.स.,मा.चंदाताई देव्हारे पं.स.सदस्य, कृ.उ.बा.स.चे माजी सदस्य बंडुभाऊ राठोड, प्रशांत खंते प्रमुख अतिथी उपस्थित होते.यावेळी वैद्यकीय अधिकारी कचारीसावंंगा डाॅ.मयुरी सावते, वै.अ.रिधोरा डाॅ.प्रशांत नागपुरे,वै.अ.भोरगड डाॅ.वर्षा बोरकर, आरोग्य निरीक्षक प्रशांत विरखरे,आरोग्य सहायक पुजा चिकराम, सी.एच.ओ.डाॅ. प्रिती गावीत ,डाॅ.शिल्पा वानखेडे,डाॅ.हेमके, एल.एच.व्ही.श्रीमती राव, कु.पायल नागमोते ,पियुष मिलमीले,सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेवीका ,क्षेत्रकर्मचारी, ए.एन.एम,आशा सेविका,गटप्रवर्तक उपस्थित होते.यादरम्यान बालकांची आरोग्य तपासणी, नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या. ० ते १८ वषै बालकांची तपासणी करण्यात* *येईल* ..

सर्व नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.या वेळी करण्यात आले.