श्रीरामपूर मध्ये संगित तुलसी रामायण

श्रीरामपूर मध्ये संगित तुलसी रामायण

*श्रीरामपूर मध्ये संगीत तुळशी रामकथेस सुरुवात..!!!*  
*श्रीरामपूर*. 
  श्रीरामचंद्र यांच्या पावन नामा वरून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले श्रीरामपूर शहारा मध्ये पावन गणपती मंदिर या ठिकाणी *दिनांक 30 जानेवारी या दिवसा पासून संगीत तुलसी रामायण कथा सत्संगाला सुरुवात झाली असून गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी श्रीराम राज्यभिषेक आहे. व दिनांक 4/02/2022 या रोजी सकाळी 10-12 या दरम्यान  महाआरती व महाप्रसादाचे नियोजन आहे*.या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर लोणार गल्ली येथील पावन गणपती मंदिरा समोर करण्यात आले आहे .रविवारी ग्रंथ महात्म्य शिव पार्वती विवाह, सोमवारी श्री राम जन्म कथा, मंगळवारी सीता स्वयंवर केवट प्रसंग बुधवारी भरतभेट ,सिताहरण ,शबरी भेट गुरुवारी श्री राम राज्यभिषेक असा रामकथेचा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 वाजे पर्यंत चालू आहे.संगीत राम कथेचे कथा प्रवक्ते *ह.भ.प.संदिप महाराज चेचरे  लोहगावकर ( रामायणाचार्य  )* हे करणार आहेत .त्यांना तबल्याची साथ ह.भ.प.हर्षद महाराज ताजणे, ह.भ.प.शिवनाथ महाराज पवार, गायन विराज महाराज मगर कथा साथ राहुल महाराज पोकळे यांची  आहे . तरी परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पावन गणपती मित्र मंडळा चे संस्थापक दिपक इंगळे कार्याध्यक्ष पंकज मांडगे सेक्रेटरी संपत पोकळे अध्यक्ष वैभव जैत संघटक सिधार्थ फंड यांनी केले आहे..!!