*ज्या गावात ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या गावात आठवडी बाजार भरवता येणार नाही; जिल्हा प्रशासनाचा आदेश*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी).

सोलापूर.              जिल्ह्यामधील मुदत संपलेल्या, आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वजनिक निवडणूक जाहीर झाली आहे.  4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असून या दिवशी कसल्याही प्रकारचा आठवडी बाजार भरण्यास मनाई आहे असा आदेश जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे.

मतदान केंद्राच्या सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी मतदाना दिवशी कसल्याही प्रकारचा आठवडा बाजार होत असेल तर तो होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार आहे. यामध्ये पानगाव (ता.बार्शी), वांगी नं.1 (ता.करमाळा), वाघोली (ता.माळशिरस) व कडबगाव (ता.अक्कलकोट) या गावांचा समावेश आहे. या गावात  4 ऑगस्ट 2022 रोजी कोणताही बाजार भरणार नाही असा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार दिले आहेत.