मनाचा मोठेपणा दाखवून सभासद,कामगार व भावी पिढिच्या हितासाठी कारखाना निवडणूक बिनविरोध करा - सुरेशराव लांबे पा .

मनाचा मोठेपणा दाखवून सभासद,कामगार व भावी पिढिच्या हितासाठी कारखाना निवडणूक बिनविरोध करा - सुरेशराव लांबे पा .

सभासद कामगार व भावी पिढीच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक करा-सुरेशराव लांबे पाटील 

 

             डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सर्व मंडळांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे,या आधी सभासदांनी ज्या ज्या मंडळाला संधी दिली त्यांना कारखाना चालवण्यात यश आले नाही.त्यांनी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवून शेतकरी कामगार व व्यापारी यांचे व भावी पिढीचे हित डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करावी व संपूर्ण महाराष्ट्रात भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेला हा कारखाना सुरळीत चालु होन्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आमचेही सहकार्य राहील असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले.

 

             पुढे माध्यमांशी बोलताना लांबे पाटील म्हणाले कारखान्याचे व सभासदांचे अस्तित्व कायम रहावे यासाठी कारखाना बचाव कृती समितीने वेळोवेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या.कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे.संलग्न शिक्षण संस्था व जमिनी विक्री न करता कारखाना पूर्ववत चालू झाला पाहिजे. यासाठी कारखाना बचाव कृती समिती आजही आग्रही आहे.

            जिल्हा बँकेतर्फे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली,केंद्रात व राज्यात सत्ता असताना मागील मंडळाला कारखाना चालविण्यात अपयश आले.तरीही सर्व मंडळ निवडणु लढविण्यास सज्ज झाले आहेत.आम्ही अनेक वेळा कारखाना निवडणुकीत तिसरा पॅनल उभा करुन सभासदांना पर्याय दिला परंतु आमच्या पॅनलचा फायदा इतरांनाच होत गेला त्यावेळची कारखान्याची परिस्थिती वेगळी होती.आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आम्ही यावेळी स्वतंत्र पॅनल करणार नाही. स्वतंत्र पॅनल तयार करू शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करून कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे यासाठी आमचे प्रयत्न व सहकार्य राहणार असून सर्वांनी बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य करावे व कारखान्याला गत वैभव प्राप्त करून शेतकरी कामगार व व्यापारी व भावी पिढीचे हित पहावे. अशी अपेक्षा सर्व मंडळाकडून शेतकरी नेते सुरेशराव पाटील यांनी व्यक्त केली.