विद्यार्थ्यांनी काळाच्या ओघात अपग्रेड होणे गरजेचे - सुनिता ताई गडाख.

विद्यार्थ्यांनी काळाच्या ओघात अपग्रेड होणे गरजेचे - सुनिता ताई गडाख.

विद्यार्थ्यांनी काळाच्या ओघात अपग्रेड होणे गरजेचे - सुनिता ताई गडाख.

खेडले परमानंद वार्ताहर//

जागतिक पुस्तक दिनाचे"  औचित्य साधत माननीय सौ. सुनीताताई शंकरराव गडाख (माजी सभापती ,नेवासा पंचायत समिती) यांची महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरगाव खेडले परमानंद तालुका नेवासा येथे सदिच्छा भेट दीली. आज दिनांक 23 एप्रिल 2024 वार बुधवार रोजी प्रसिद्ध जागतिक कवी लेखक तसेच नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस जगभरात जागतिक पुस्तक दिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. या शुभ दिनाचे औचित्य साधत शिरेगाव खेडले परमानंद येथील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई चे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव-खेडले परमानंद येथे माननीय सौ सुनीताताई शंकरराव गडाख माजी सभापती पंचायत समिती नेवासा यांनी सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटी प्रसंगी आदरणीय सुनीताताई गडाख यांनी नुकतेच नव्याने बनविण्यात आलेले विद्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार, विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे सध्या उच्च पदावर कार्यरत आहे व आपल्या कार्यकर्तृत्वाने संस्थेचा शाळेचा गावाचा व परिसराचा नावलौकिक वाढवीत आहे, अशा विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी फ्लेक्स बोर्ड, तसेच खुले वाचनालय, विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलविलेली परसबाग, विद्यालयातील विविध प्रकारचे झाडे वनस्पती वेली अशी निसर्ग संपदा, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा  पोषण आहार, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा यासाठी संस्थेने उभारलेली अटल लॅब, ग्रंथालय, प्रयोगशाळा , प्रशस्त मैदान, शैक्षणिक सहल, कंपोस्ट खत प्रकल्प तसेच विद्यालयाकडून वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रम याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी काळाच्या ओघात अपग्रेड व्हावे व  मोबाईलचा वापर आवश्यक गोष्टीसाठीच करण्याचा सल्ला दिला. तसेच अवांतर वाचन, वर्तमानपत्राचे वाचन, मासिके कादंबऱ्या वाचण्याचा व त्यासाठी वेळ काढण्याचा मोलाचा  सल्ला दिला. आपण सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी असूनही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. विद्यार्थ्यांनी आपला कल ओळखून पुढील दिशा निश्चित करावी व यशस्वी होऊन आपले योगदान समाजासाठी द्यावे अशी भावना व्यक्त केली. तसेच आपल्या अंगी असलेल्या क्षमतेला वाव मिळण्यासाठी निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, जनरल नॉलेज स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुख्याध्यापक व सहकारी यांना सुचविण्यात आले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला. विद्यालयाच्या परिसरामध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लहानू ढाले सर, श्री सुभाष जाधव सर श्री दीपक गडाख सर, श्री राजदेव सर श्री संजय जाधव सर, श्री दशरथ लांघे सर, श्री कानडे सर, श्री बेल्हेकर सर, होन मॅडम, श्री ज्ञानदेव तुवर,  श्री दादासाहेब होन, सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश जाधव, यशवंत स्टडी क्लब चे ग्रंथपाल/सहसमन्वयक श्री. दादासाहेब तुवर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाधव सर व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री लहानु ढाले सर यांनी केले

 

मा सुनीता ताई गडाख यांच्या हस्ते वृक्ष रोपण करताना मुख्याध्यापक लहानू ढाले सर, तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते,

 

 

स्व भास्करराव बाजीराव जाधव यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जाधव कुटुंब यांनी दिलेली रोपे त्याचे मा सुनीताताई गडाख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले 

 

महात्मा गांधी विद्यालयचा परिसर स्वच्छ सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आहे व क्रीडांगण  कौतुकास्पद आहे, विद्यार्थीच्या दृष्टीने शाळेचे अभ्यास पूरक वातावरण असून विविध उपक्रम शाळेत राबविले जातात

मा सुनीता ताई गडाख

माजी सभापती