महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडला खळबळ जनक प्रकार. महसूल प्रशासनातील निंदनीय घटना.

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडला खळबळ जनक प्रकार.     महसूल प्रशासनातील निंदनीय घटना.

      राहुरी तहसीलदाराच्या मनमानी कारभाराला वैतागून देहरे ता नगर येथील रेवननाथ शालिकराम धनवटे 41 वर्षीय वडार समाजाच्या युवकाची आत्महत्या.

        घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की सदर युवक दोन दिवसापासून बेपत्ता होता.

   आज दिनांक 11 /12 /2022 रोजी या युवकाची मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे.

सदर मृतदेह नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

या आत्महत्येचे कारण ऐकून धक्काच बसेल .

     मृत युवकाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरीचे तहसीलदार शेख यांनी डबर उत्खनन करणाऱ्या वडार समाजाच्या युवकाचे ट्रॅक्टर अडवून जप्त केले त्यानंतर त्या युवकाकडे संपूर्ण उत्खनंची रीतसर परवानगी असताना हि त्याला त्याचे वाहन ताब्यात देण्यात आले नाही.

       याच जाचाला कंटाळून या युवकाने आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतली असल्याचे समजले आहे.  

     जोपर्यंत राहुरी येथील दोषी तहसीलदार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे .

त्यामुळे नेवासा तालुक्यात नेवासा ग्रामीण रुग्णालया समोर सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.