नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा स्तुत्य उपक्रम. क्रिकेट स्पर्धा मधुन चांगले खेळाडू घडवतील.

नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा स्तुत्य उपक्रम. क्रिकेट स्पर्धा मधुन चांगले खेळाडू घडवतील.

नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा स्तुत्य उपक्रम. क्रिकेट स्पर्धा मधुन चांगले खेळाडू घडवतील.

 ( वार्ताहर) -सोनई - नेवासा तालुक्यातील सोनई मुळा साखर कारखाना येथे नाथपंथी डवरी गोसावी चषक 2023या भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन तिन व चार मार्च रोजी समस्थ नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन​ मुळा कारखान्याचे चेरमन नानासाहेब तुवर,​ कडुबाळ कर्डीले, सोनई चे सरपंच धनंजय वाघ,यांचे हस्ते करण्यातआले.

 नाथपंथी डवरी गोसावी समाज क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयोजीत करतात.खेळाने आरोग्य सुधारते. जिवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे.फक्त समाजासाठी असणा-या स्पर्धेमध्ये राज्यभरातील खेळाडू संघ आले आहे.यातुन राज्य व देश पातळी पर्यंत जाणारे खेळाडू घडवतील अशी आशा व्यक्त करुन आयोजकांना मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी सोनई येथील मुळा कारखाना मैदानावर उद्घाटन करताना शुभेच्छा दिल्या.

 सहा षटकांचे सामने टेनिस बाॅलवर खेळवण्यात येणार आहे .स्पर्धेत विस संघांनी भाग घेतला आहे. तर विठ्ठल शेगर,बाबा शिंदे पंचाची जबाबदारी पार पाडणार आहे.

   जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गडाख यांचे २१०००,ज्ञानेश्वर शिंदे १५१११,कल्याण ऊभेदळ ११०००,राजुभाऊ गुगळे ५०००,उदय पालवे ५००० वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली.तर प्रथम येणाऱ्या संघास संतोष चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी मुळशी यांचे वतीने २१,१११ तर द्वितीय महादेवजी शिंदे सहाय्यक आयुक्त मुंबई यांचे वतीने १५,१११ ,सोनई ग्रामपंचायत वतीने ११,१११ या प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.या वेळी माजी उपसरपंच उदय पालवे, संजूबाबा गायकवाड, आबासाहेब लोखंडे, पत्रकार गणेश बेल्हेकर, अशोक भुसारी व आयोजक मोहन शेगर पत्रकार, बाबा शिंदे, अजिनाथ शेगर, विठ्ठल शेगर, बाबाजी शेगर,विजय शिंदे, सागर शिंदे दया सावंत, अब्बा सावंत, तानाजी शेगर, सागर शिंदे संतोष चौगुले,सह आदी उपस्थित होते.

--फोटो ---नाथपंथी ड्रीम गोसावी समाज क्रिकेट स्पर्धा उद्घाटन करताना मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर ,कडुबाळ कर्डिले,सरपंच धनंजय वाघ