भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब वामन शिंदे यांचे दुःखद निधन..

भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब वामन शिंदे यांचे दुःखद निधन..

*निधन वार्ता*

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब वामन शिंदे यांचे शनिवार दि 0 9 / 05/2026 रोजी वयाच्या 59 व्या वर्षा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

भारतीय सैन्य दलात आपल्या शौर्याने गावाची देशाची शान राखणारे लढाऊ योद्धा बाळासाहेब शिंदे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर नव्हे तर संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे.

    धीर- गंभीर संयमी स्वभाव हसतमुख व्यक्तिमत्व हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सेवानिवृत्तीनंतर जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे त्यांनी उत्तम प्रकारची शेती केली .

       त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,मुलगा,दोन मुली असा मोठा परिवार आहे.