NEET पेपर फुटी प्रकरणात CBI ने देवळाली परिसरात धाड टाकली असून राहुरीतील धनंजय लोखंडे याला अटक केली आहे.

*NEET पेपर फुटी प्रकरणी CBIची देवळालीत कारवाई; राहुरीच्या धनंजय लोखंडेला अटक*

*नाशिक/अहिल्यानगर, दि. 13 मे 2026*: NEET पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता CBI कडे गेला असून एजन्सीने देवळाली परिसरात धाड टाकली. या कारवाईत राहुरी तालुक्यातील माहेगाव-महाडूक येथील धनंजय निवृत्ती लोखंडे याला अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासानुसार नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमधून पेपर फुटल्याचे समोर आले आहे. नाशिकमधून शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय लोखंडेचे नाव समोर आले. लोखंडे हा http://B.A.MS पदवीधर असून पुण्यात मेडिकल अॅडमिशनसाठी कन्सल्टिंग करत होता.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनीषा वाघमारे या महिलेलाही ताब्यात घेतले आहे. ती धनंजय लोखंडेला मदत करत होती आणि विद्यार्थ्यांना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती असा संशय आहे. तिला आज सायंकाळपर्यंत CBIच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये फुटलेला पेपर 10 लाखात विकत घेऊन 15 लाखात विकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता आंतरराष्ट्रीय कटाच्या अँगलने सुरू आहे.