हिंदीची अस्मिता जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी. ..! !महाराष्ट्र हिंदी विद्यालयात हिंदी पंधरवडा दिनी डॉ. संध्याराणी मोहिते यांचे प्रतिपादन. .! !
औरंगाबाद -
हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान आणि तिची अस्मिता जपणे ही प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनात हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून कार्य करते. या भाषेमुळे मानवी जीवनावर सुसंस्कार होतात असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिव्याख्याता डॉक्टर संध्याराणी मोहिते यांनी केले.शहागंज येथील महाराष्ट्र राज्य हिंदी विद्यालय महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा व महाराष्ट्र हिंदी ग्रंथालय तथा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पंधरवडादिनी निमित्तआयोजित आंतरशालेय वक्तृत्व वादविवाद स्पर्धेमध्ये विजेत्यांचा गौरव समारंभात प्रमुख पाहुणीय भाषणात डॉक्टर संध्याराणी मोहिते यांनी हिंदी भाषे विषयी उदगार काढले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हिंदी प्रचार सभा हैदराबादचे तथा अखिल भारतीय हिंदी संस्था संघ नवी दिल्ली चे उपाध्यक्ष डॉ. चंद्रदेव कवडे हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पुरी ,सचिव डॉ.नारायण वाकळे परीक्षक गण प्रा. मोमिना हबीब भंडारे ,शरीफउद्दीन शेख,ज्ञानोबा फंड,शिवलिंग वाणी,रंजना जयस्वाल,कुंदन जगताप, मुख्याध्यापक रवींद्र तायडे,किशोर पाटील पर्यवेक्षिका संध्या कवडे शिक्षक प्रतिनिधी प्रकाश वाघमारे यांची उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व दिप प्रज्वलन करून झाली मुख्याध्यापक रवींद्र तायडे यांनी शाळा व हिंदी ग्रंथालय तसेच विविध उपक्रमाविषयी माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली. महाराष्ट्र हिंदी विद्यालयाने स्पर्धेसाठी फार मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे मत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणारी रूपाली गाडेकर हिने सांगितले. यावेळी सर्व स्पर्धेतील स्पर्धकांना स्मृतिचिन्ह,प्रशस्तीपत्र तसेच गुलाब पुष्प देऊन त्याच प्रमाणे वाद-विवाद स्पर्धेतील स्पर्धकांना ऑनलाईन बक्षिसांची रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संदीप भदाणे यांनी तसेच स्पर्धकांच्या यादीचे वाचन साहेबराव पाटील व सोनाली वाकळे यांनी करून आभार प्रदर्शन शुभांगी दसपूते यांनी केले.