प्रवरानगरकडे जाणाऱ्या रोडवर स्वागतासाठी: मेलेले जनावरे, कचरा, व अतिक्रम..

प्रवरानगरकडे जाणाऱ्या रोडवर स्वागतासाठी: मेलेले जनावरे, कचरा, व अतिक्रम..

प्रवरानगरकडे जाणाऱ्या रोडवर स्वागतासाठी: मेलेले जनावरे, कचरा, व अतिक्रम..

प्रतिनिधी: प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सहकाराचे माहेरघर म्हणून देशभरात ओळखले जाणारे प्रवरानगर, जिथे पंतप्रधानांपासून अनेक दिग्गज मंत्री, नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नियमितपणे भेट देतात, तेथील प्रवेशमार्ग मात्र अतिशय दयनीय अवस्थेत आहेत.
बाभळेश्वरकडून प्रवरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोणतेही स्पष्ट दिसेल असे मार्गदर्शक फलक नसून, दत्त मंदिरापासून प्रवरानगरकडे येताना रोडवर काटेरी भाभळींचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यावर जनावरांचा शेण, चारा, आणि ओढ्याच्या कडेला टाकलेला कचरा व मेलेली जनावरे यामुळे प्रवास करणाऱ्यांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

प्रवरानगर कडे येणाऱ्या रोडला विशेष महत्व:

प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना, प्रवरा पब्लिक स्कूल व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय, सहकाराचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची समाधी स्थळ असून,
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार देखील प्रवरांनगर येथे असून, लोहगाव, प्रवरानगर, पाथरे, सोनगाव ई. ठिकाणी जाणारा महत्वाचा रहदारी असलेला मुख्य रस्ता असतांना देखील सदरील रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर प्रशासन व स्थानिक  पुढारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.


तीन ग्रामपंचायतींची हद्द:

विशेषतः बाभळेश्वर, लोहगाव व लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्यात अस्वच्छता अत्यंत गंभीर पातळीवर असून, या दुर्गंधीमुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. परिसरात याआधीच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुल जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.


मुख्य रोडवर अतिक्रमणं:

तसेच बाभळेश्वर, लोहगाव व लोणी खुर्द हद्दीतून प्रवरानगरकडे जात असलेल्या मुख्य रोडवर बेजबाबदार लोकांनी अतिक्रमण करून, रस्त्यावर मुरूम टाकल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले असून, जोशिवस्ती येथील वळणार देखील सतत अपघातांची मालिका सुरू आहे.
दरम्यान, सदरील रोडवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांची हद्द निश्चित न करता, महावितरण कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू असून, सदरील कामासाठी उभे राहणारे खांब येत्या काळात वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरतील अशी भीती जागरूक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


स्थानिक पुढाऱ्यांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह..?

लोणी खुर्द, बाभळेश्वर, व लोहगाव या तिन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतून प्रवरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अस्वच्छता, दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना, या तिन्ही ग्रामपंचायत हद्दीतील स्वतःला “नेते” म्हणून गावभर मिरवणारे स्थानिक पुढारी मात्र गायब असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
जयंती, लग्नसोहळा, वाढदिवस ते भावपुर्ण श्रद्धांजली च्या फ्लेक्स बोर्ड पासून सोशल मीडियात आघाडीवर असणारे पुढारी, जनतेच्या गंभीर समस्यांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.


प्रशासनाचे तक्रारींकडे दुर्लक्ष:

स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पालकांनी यापूर्वीही प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे “सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.


नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने प्रवरानगर कडे येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रण, कचरा व मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावून, बेशिस्त वर्तन करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या जबाबदारांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.