शिवशाही थाटत इंदलकर वाडीत शिवजन्मोत्सव साजरा

शिवशाही थाटत इंदलकर वाडीत शिवजन्मोत्सव साजरा

   प्रतिनिधी :-

जालना

रयतेचा राजा म्हणून शिवरायांनी लोकांच्या मनात अधिराज्य केले. सर्व धर्मसमभाव एकच धर्म स्विकारून अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेऊन त्यांच्या विचाराचे आचरण करावे असे प्रतिपादन शिवचरित्रकार ह भ प कल्याण महाराज वारे यांनी केले. जालना तालुक्यातील इंदलकर वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवशंकर नवतरुण भजनी मंडळ, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान व समस्त गावकरी मंडळी यांनी आयोजित केलेल्या भव्यकीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. शिवभक्ता कडून शनिवारी जयंती मोठ्या उत्साहाने व थाटामाटात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजाची भव्य सांप्रदायिक पद्धतीने मिरवणुक काढण्यात आली. या सोहळ्यात वारे महाराजांनी छत्रपतींच्या इतिहास व कार्याची महती विशद केली. यावेळी उपस्थित मृदंगाचार्य गणेश महाराज शिंगणे, गायनाचार्य अमोल महाराज सोळुंके, गायनाचार्य शंकर महाराज अनपट, हार्मोनियम माऊली महाराज बुलढाणाकर, घुमरे महाराज, योगेश महाराज खरात, सर्व शिवशंकर नवतरुण भजनी मंडळ, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान, गावकरी मंडळी इंदलकरवाडी व पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांची याप्रसंगी उपस्थिती होती. याप्रसंगी कडूबा इंदलकर यांनी सर्वांचे आभार मानले.