श्रीरामपूर - दिनांक ९ जुन २०२३ रोजी शासकीय आय.टी.आय.श्रीरामपुर यांचे वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर समुपदेशन मेळावा प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे यशस्वीरित्या संपन्न
श्रीरामपूर - दिनांक 9 जुन २०२३ रोजी शासकीय आय.टी.आय.श्रीरामपुर यांचे वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर समुपदेशन मेळावा प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे यशस्वीरित्या पार पडला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरामपुर चे माननीय आमदार श्री़ लहुजी कानडे साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शाहू महाराज व सरस्वतीचे पूजन करून करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे श्री पी डी पाटील (माजी प्राचार्य) हे होते सदर कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने श्री उमेश पालवे साहेब हे उपस्थित होते तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग यांच्यामार्फत श्री. पंतम साहेब उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक श्री. शैलेश आंबेकर, चेअरमन आयएमसी ऑफ आयटीआय, श्रीरामपूर उद्योजक श्री प्रवीण घोगरे साहेब, श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सहाणे सर व श्री मंगेश देशपांडे हे उपस्थित होते तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री ओमकार मगदूम यांनी इयत्ता दहावी व बारावी नंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन केले श्री. मंगेश रसाळ सर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर उपस्थांचे मन जिंकले श्री. शेख सर प्राचार्य, आय.टी.आय. अशोकनगर, यांनी "उद्योजकता व रोजगार" या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच श्री. बाळासाहेब मुंडे यांनी खादीग्राम उद्योग मार्फत सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात येणाऱ्या कर्ज योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री प्रमोद कुमार मोरे आय टी आय, संगमनेर यांनी शिष्यवृत्ती योजनेबाबत सविस्तर माहिती दिली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात युवक युवतींची उपस्थीती होती . सदर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे प्राचार्य, श्री राजेश खोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी श्री भगत सर श्री चौधरी सर श्री पालवे सर गटनिदेश श्री माळी सर श्रीमती घोडके मॅडम व सौ इंगळे मॅडम, श्री पवार सर श्री बने सर व सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यामागे परिश्रम घेतले. Reporter Delhi91.Com-Ahmednagar-Shrirampur-Nikale Prakash