राहुरी शिंगणापूर रोड वरती उंबरे परिसरात तांबे पेट्रोल पंपा समोर भीषण अपघात

राहुरी शिंगणापूर रोड वरती उंबरे परिसरात तांबे पेट्रोल पंपा समोर भीषण अपघात

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी शिंगणापूर रोड उंबरे येथे तांबे पेट्रोल पंपा समोर भीषण अपघात 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील भाविक शिंगणापूरला दर्शनासाठी चालले असता उंबरे येथे तांबे पेट्रोल पंपाच्या समोर शिंगणापूर कडून शिर्डी कडे भरधावयाने टेम्पो ट्रॅव्हल आणि या रिक्षाचा समोरासमोर जोरात धडक झाली आणि टेम्पो ट्रॅव्हल रिक्षाला धडकून चक्काचूर करून शिंगणापूर रोड वरून शेजारील वावरांमध्ये जाऊन पलटी झाली या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये 20 ते 22 प्रवासी होते यामधील काही प्रवासी जखमी झाले असून परीक्षा मधील सर्व प्रवासी जबर जखमी झाली त्यामधील तीन प्रवासी जागीच घटनास्थळी ठार झाले

ही माहिती मिळतात राहुरीचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी यांनी व काही नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य तत्पर सुरू करण्यात आले व जखमीला योग्य तो उपचार वेळेस मिळाला व रस्त्यावरील होणारी ट्रॅफिकची वर्दळ पाहता धडक झालेली रिक्षा व मयत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली या अपघातामध्ये  तीन लोक मयत झाले असून मयतांची नावे दीपक जगन डावखर राहणार इगतपुरी ,गिरणारे /आकाश मनोहर डावकर ,दीप विजय जाधव सर्व राहणार इगतपुरी गिरणारे नाशिक