विद्रोही विद्यार्थी संघटनेकडून बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली.

श्रीरामपूर: शेती संस्कृतीचे महानायक, समताप्रिय ,न्यायप्रिय, महापराक्रमी बळीराजाला अभिवादन करण्यासाठी शंभुक वसतिगृह, वॉर्ड न. ३ श्रीरामपूर येथे विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने बलिप्रतिपदा दिना निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी विद्रोही विद्यार्थीचे राज्य समन्वयक प्रकाश रणसिंग व बामसेफचे रमेश मकासरे सर यांचे बळी राज्यावर व्याख्यान झाले. बळीची न्याप्रिय व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतकरी कामगार, मजूर वर्गाने भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आल पाहिजे. बहुजन समाजाने महामानवाच्या विचारावर मार्गक्रमण करून सांविधनिक हक्क, अधिकार साठी लोकशाही बळकट कण्यासाठी संविधनिक मार्गाने लढा द्यायला हवा. व तो आपण देण्यास कटिबध्द आहोत. या प्रसंगी अशोक दिवे, बाबासाहेब थोरात, सुधाकर बागुल, गोविंद सडमाके, अनिल पंडित, गौतम राऊत, भगवान खरात, राहुल साळवे, मनोज निकम, किरण नारोडे, राहुल अल्हाड, राजेंद्र हिवराळे, कडूबा दाभाडे, नवनाथ पाडवे, सिध्दार्थ दिवे, अनिकेत खैरे, यश निकम आदी. कार्यकर्ते ,महिला बहिणी, विद्यार्थी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले. bpslivenews/Reporter, Shrirampur/Prakash Nikale