अहमदनगर येथील बांधकाम साईटवरील प्लंबिंग व इतर साहित्याची चोरी करणारे 3 आरोपी जेरबंद, 2,24,200/- रु . किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला हस्तगत .
गुलमोहर रोड, अहमदनगर येथील बांधकाम साईटवरील प्लंम्बिंग व इतर साहित्याची चोरी करणारे 3 आरोपी जेरबंद, 2,24,200/- रुपये किंमतीचा माल हस्तगत.
घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की मकरंद कृष्णाजी देशपांडे या बांधकाम व्यवसायिक काने दिलेल्या फिर्यादीनुसार समर्थ शाळे समोर, सावेडी, अहमदनगर यांच्या किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड, अहमदनगर येथे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणावरुन कोणीतरी अनोळखी चोरट्याने 2,51,000/-रुपये किंमती च्या नळ, कॉक, वायर बंडल, ड्रिल मशिन, ग्राईंडींग मशिन व ब्रेकर चोरुन नेल्या बाबत तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 408/2024 भादविक 380, 457 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,यांनी पो .नि . दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करुन संबंधित गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते .
पो .नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुन ना उघड गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास सदर गुन्हा हा इसम नामे अभिमन्यु कुसळकर रा. सावेडीनाका, अहमदनगर याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन ते सुझुकी शोरुम मागे, सावेडीनाका परिसरात फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सावेडी नाका परिसरात जावुन संशयीत इसम नामे अभिमन्यु कुसळकर याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन बातमीतील वर्णना प्रमाणे 3 संशयीतांना सावेडीनाका परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अभिमन्यु विलास कुसळकर वय 22, रा. सुझुकी शोरुम मागे, सावेडी नाका, अहमदनगर, 2) कृष्णा सुजय कु-हाडे वय 24, रा. झोपडी कॅन्टींग, अहमदनगर व 3) अजय रुस्तुम शिंदे वय 26, रा. कुरेशी हॉटेल मागे, कोठला अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगुन गुन्ह्यात चोरी केलेला 88,200/- रुपये किंमतीचे वायर बंडल, 50,000/- रुपये किंमतीचे कॉक, 6,000/- रुपये किंमतीचे ड्रील मशिन व गुन्हा करताना वापरलेली 80,000/- रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,24,200/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन, तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 408/2024 भादविक 380, 457 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर व प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.