पंडित जवाहरलाल नेहरू तबला अकॅडमी देडगाव चा विद्यार्थी अहमदनगर मध्ये प्रथम येऊन जिल्ह्यात झळकला.

पंडित जवाहरलाल नेहरू तबला अकॅडमी देडगाव चा विद्यार्थी अहमदनगर मध्ये प्रथम येऊन जिल्ह्यात झळकला.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये बालाजी देडगाव येथे चि.बाबासाहेब देवदान दळवी हा तबला वादन परीक्षेमध्ये अहमदनगर केंद्रात प्रथम आल्याने त्याचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बथूवेल डी. हिवाळे सर यांनी केले.

        प्रास्ताविकात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल यांच्यातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेमध्ये प्रवेशिका प्रथम ही परीक्षा विशेष योग्यते मध्ये उत्तीर्ण होऊन अहमदनगर केंद्रा मध्ये प्रथम आला आहे.

      तबल्याच्या मोठ्या परीक्षा अजून यायच्या आहेत परंतु आम्हाला खात्री आहे की तो अशाच पद्धतीचे यश येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये मिळविल.

     अगदीं गरीब कुटुंबातील हा विदयार्थी. वडील ऊसतोड कामगार आहेत. देडगाव मध्ये शिक्षणाचे बीज रोवणारे श्री बाजीराव पाटील मुंगसे उर्फ अण्णा यांच्या हस्ते त्याचा आज सत्कार करण्यात आला. ग्रामीण गुणवत्तेची कदर करणारे पत्रकार श्री इन्नुसभाई पठाण यांनी हा सत्कार आयोजित केला होता. पहाटेच उठून ऊसतोड करण्यासाठी गेलेले त्याचे वडील श्री देवदान दळवी हे या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत. सत्काराला उपस्थित राहिले तर त्यांचा पाचशे रुपये रोज बुडू शकतो. तबल्याच्या या परिक्षेला आवश्यक असणारी फीस भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तर गावातील एक नेते मा. चेरमन बाबासाहेब हरिभाऊ मुंगसे यांनी त्याची फिस भरली.

       आजच तो ख्रिश्चन भजने परिसरामध्ये गाजवत आहे. आज जरी गरिबी असली तरी त्याला तबल्याकडून काही अपेक्षा आहेत.

    त्या सर्व अपेक्षा पूर्ण होवोत, भविष्याची हिरवाई प्रत्यक्षात त्याच्या जीवनात साद घालू दे या शब्दात मनोगत व्यक्त केले.

         या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बंशि भाऊ एडके, शिवचरित्रकार कृष्णा शिरसाठ यांनीही मनोगत व्यक्त केले. 

बालाजी देडगाव हे अतिशय पुरोगामी विचाराचे वैभव शालि गाव आहे. चागल्या कामाला प्रेरणा देणे ही महत्त्वाची खशियत आहे.

    या कार्यक्रमास पंडित जवाहरलाल नेहरु या अकॅडमिचा व अकॅडमीचे संचालक तबला विशारद संदिप नांगरे सर यांचाही गौरव करण्यात आला.

      या कार्यक्रमास देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, जनार्धन तांबे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर , ग्रामपंचायत सदस्य महादेव पुंड,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, चाइल्ड इंग्लिश स्कूल चे संस्थापक सागर बनसोडे, माजी चेअरमन शिवाजी बनसोडे, जगन्नाथ कुटे ,बंशी पाटील मुंगसे ,ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे , दत्ता पाटील मुंगसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस पठाण यांनी केले तर आभार सागर बनसोडे सर यांनी

मानले.