मुसळवाडी पूर्व भागात घाडगे वस्ती परिसरात बिबट्याची दहशत. लोकवस्तीत राजरोस वावर.
प्रतिनिधी:- संभाजी शिंदे, राहुरी
दिनांक 6 जून
मुसळवाडी परिसरात बिबट्याची दहशत
मुसळवाडी पूर्व भागात घाडगे वस्ती परिसरात राजरोस बिबट्या मोकाट फिरताना दिसून येत आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. भर दिवसा लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक चिंतातुर झाले आहेत. या बिबट्याने या अगोदर अनेक शेळ्या, व कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.
या गोष्टीबद्दल वारंवार तक्रार करूनही वनाधिकारी लक्ष घालत नसल्याचे ग्रामस्थांकडून समजते.
घाडगे वस्ती च्या दक्षिण भागात जंगल सदृश्य इरिकेशन बंगला असल्याकारणाने या भागात बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आहे. तरी जबाबदार अधिकारी वर्गाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक सुरेश घाडगे, प्रकाश कड, संजय राजाळे, बाळासाहेब घाडगे, आप्पासाहेब घाडगे , प्रभाकर बोरुडे,
आदी नागरिकांनी केली आहे.