वृद्ध दाम्पत्याची निर्घुण हत्या करून जबरी चोरी करणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव पोलिसांच्या धडक कारवाईत जेरबंद .
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद, नेवासा
सदर घटनेचा वृत्तांत असा आहे की जालिंदर दत्तात्रय भुजाडे यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की मी नोकरीनिमित्त कुटुंबासह पुणे या ठिकाणी असतो. 30 /5 /2022
1/6 /2022 या दरम्यान फिर्यादी जालिंदर यांची आई राधाबाई दत्तात्रेय भुजाडे,वय65 वर्षे व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे वय 75 वर्षे या वयोवृद्घ दाम्पत्याची निर्घुण हत्या करून कपाटाची उचकापाचक करून एक लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये निर्गुण हत्या व जबरी चोरीची फिर्याद नोंदवली गेली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी.जी शेखर पाटील , पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाची सूत्र हलवली, सदर घटनेचे परीक्षण करून त्याबाबत मार्गदर्शन करून तात्काळ तपास करण्याचे आदेश काढले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर पोलीस अधिकारी अनील कटके व अमलदार यांचे तीन पथके नेमून तपासाबाबत सूचना करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त रीत्या तांत्रिक परीक्षणाच्या आधारे अशा प्रकारचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना. पथकास गुप्त बातमी द्वारे खबर मिळाली की सदरचा गुन्हा अजय काळे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. सदर आरोपी हा त्याच्या राहत्या घरी असून पळून जाण्याच्या तयारीत आहे.
अशा प्रकारची खात्रीशीर माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधिकारी अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी ,राहुल सोळुंके, सचिन अडबल, संदीप चव्हाण ,दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने, रोहित एफुल ,रंजीत जाधव, वाहन चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, चालक पोलीस नाईक भरत बुधवंत, तसेच कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव , साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख अशा फौज फाट्याने मिळून
आरोपी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणी माहिती घेऊन चौकशी करत असताना एक व्यक्ती संशयास्पद रित्या हालचाली करत पळू लागला. त्याला मोठ्या शिताफीने पकडले व त्याची पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता तो अजय छंदू काळे वय 19 वर्षे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव हाच तो असल्याचे निष्पन्न झाले.
वरील गुन्ह्या बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु पोलिस खात्याने विश्वासात घेतल्यानंतर हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार अमित कागद चव्हाण वय 20 वर्षे, जनतेस छंदू काळे वय 22 वर्षे सर्वजण राहणार पडेगाव तालुका कोपरगाव यांनी केल्याची कबुली दिली. या तिघांनी मिळून ही निर्घुण हत्या व जबरी चोरी केल्याचे उघड झाले.
वरीलपैकी अमित कागद चव्हाण व जंतेस काळे हे त्यांच्या राहत्या घरीच सापडले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या तीनही आरोपींवर जबरी चोरी, घरफोडी, मारामाऱ्या अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने केली.