*वंचित बहुजन आघाडी चा राज्यमंत्री* *प्राजक्त तनपुरे यांच्या* *कार्यालयावर जनआक्रोश* *मोर्चा*
*(राहुरी प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या* *मुख्यमंत्री सौर कृषी* *पंप योजनेअंतर्गत* शेवगाव व पाथर्डी तालुक्यासह !जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे बनावट दाखले जोडून अनुसूचित जमातीच्या कोट्यावधी रुपयावर दरोडा टाकणाऱ्या टोळीची सखोल चौकशीकरून कारवाई करणे बाबत दिनांक 26 जून रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा प्रदेशउपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी दिला आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2018 2021 मध्ये राज्यभरात सर्वसाधारण गट अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदिवासी मधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना राबवण्यात आलेली होतीया योजनेत ाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी लागणारा निधी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभाग या विभागाकडून विशेष घटक योजना आदिवासी उपयोजना कोट्यवधी रुपयांचा निधी वापरलेला आहे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने लाभार्थ्यांची निवड करुन जिल्ह्यातील शेकडो लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे परंतु जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभ घेणार्या शेतकर्यांची गावे गावे चौकशी केली असता धक्कादायक बाब पुढे आली असून सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे बनावट प्रमाणपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेतलेला आहेया प्रकरणासाठी जोडलेल्या जातीचे प्रमाणपत्र वरून ही बाब समोर आलेली आहे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर सौर ऊर्जा पंपासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती कार्यरत असून त्या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी साहेब तहसीलदार जिल्हा अधीक्षक कृषी विभाग अधीक्षक अभियंता महावितरण सहाय्यक आयुक्त .समाज कल्याण अधिकारीआदिवासी प्रकल्प विकास अधिकारी मुख्य व्यवस्थापक महा ऊर्जा असे उच्च श्रेणीचे अधिकारी निवड समितीमध्ये असतानाही अशा बोगस लाभार्थ्यांची निवड झालीच कशी असाप्रश्न निर्माण झाला आहे लाभार्थ्याची निवड करताना समितीकडून लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची चौकशी करण्याची आवश्यकता असताना का झाली नाही तसेच सौर पंपाचा लाभ घेतांना स्वतःची शेती व जलस्तोत्र निकष असतानाही काही लोकांना हे .प्रकरण मंजूर कशी झाली याबाबत राज्य शासनावर प्रश्न निर्माण झाला आहे या कथीत घोटाळ्याची समक्ष अधिकारी यांच्या मार्फत चौकशी समिती नेमून या प्रकरणातील घोटाळा करणारे बोगस लाभार्थीएजंट व जिल्हाधिकारी स्तरावर नेमलेल्या समितीची चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करू या मागणीसाठी 26 जून रोजी राहुरी येथील गाडगे आश्रम या ठिकाणाहून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी चा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे अशी माहिती जिल्हा महासचिव अनिल जाधव यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्षसुरेश लांबे यांनी देखील पाठिंबा दिला आहे .यावेळी जिल्हा महासचिव अनिल जाधव महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई बाचकर राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके तालुका उपाध्यक्ष गणेश पवार नेवासा तालुका अध्यक्ष उदय कर्डक देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे , ताकटे मामा यांचे निवेदनावर सह्या आहेत