श्री . हिम्मतराव माळी व श्री.ऋषिकेश भोसले हे आहेत मे महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .

श्री . हिम्मतराव माळी व श्री.ऋषिकेश भोसले हे आहेत मे महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .

*श्री. हिम्मतराव माळी व श्री. ॠषिकेश भोसले हे आहेत मे महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स*

*राहुरी विद्यापीठ, दि. 3 मे, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. मे महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन श्री. हिम्मतराव माळी व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन श्री. ॠषिकेश भोसले यांची निवड झालेली आहे. श्री. हिम्मतराव माळी हे मु.पो. न्याहाली, ता.जि. नंदुरबार येथील शेतकरी असून कृषि पदवीधर श्री. ॠषिकेश भोसले हे मु.पो. नरंदे, ता. जि. कोल्हापूर येथील कृषि उद्योजक आहेत.

 शेतकरी आयडॉल श्री. हिम्मतराव माळी यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला लागवड करून संरक्षित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, त्याचप्रमाणे बाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाल्याच्या विविध पिकांची वर्षभर लागवड करून चांगले उत्पादन घेतले आहे. शेवग्याची शबनम नावाची स्थानिक जात विकसित करून विक्री व्यवस्थापनातून बाजारामध्ये हिम्मतराव का शेवगा अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष या नात्याने नंदुरबार जिल्ह्यात कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रसार केला. कृषि उद्योजक श्री. ॠषिकेश भोसले यांनी कोल्हापूर कृषि महाविद्यालयातुन बी.एस्सी. कृषिची पदवी घेतलेली आहे. त्यांनी सन 2018 साली सुरु केलेल्या श्रीराम फ्लॉवर्स उद्योगातून कट फ्लावर्स मधील अनेक सुधारित वाणांबरोबरच जरबेरा, गुलाब, लिमोनियम, कामिनी यासारख्या फुलांची लागवड केली तसेच कट फ्लावर्स लागवड, पॅकेजिंग व मार्केटिंग यातून फुलशेतीचा व्यवसाय फायदेशीर केला. कट फ्लावर्स मधील नवीन वाण परदेशातून आयात करून त्यांचे परिसरातील शेतकर्यांना वितरण केले आणि कोल्हापूर परिसरातील शेतकर्यांना फुल शेती करण्यासाठी प्रवृत्त केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.